Beautiful Bugs: गुलाबी, लाल, पिवळा, हिरवा, पांढरा, काळा असे अनेक रंग निसर्गाकडून आपल्याला मिळाले आहेत. निळे आकाश, हिरवी झाडं, रंगीबेरंगी फुलं, पक्षी आपल्याला निसर्गात पाहायला मिळतात. रंगीबेरंगी फुलं, पक्षी आपण अनेकदा पाहतोच. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? या जगात रंगीबेरंगी कीटकदेखील आहेत, जे त्यांच्या सुंदर रंगांमुळे खूप सुंदर आणि आकर्षक वाटतात.
बीबीसी वाइल्डलाइफच्या मते, कीटकांच्या अद्वितीय दिसण्यामागे छद्मवेश, मिलन व संरक्षण अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे ऑर्किड मॅन्टिससारखे कीटक त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात मिसळतात आणि त्यांच्या भक्षकांना हुलकावणी देत, निसटून जातात किंवा अदृश्य होतात.
जंगलात आढळणारे सर्वांत सुंदर कीटक आणि किडे
पिकासो बग
२०११ च्या एका अभ्यासानुसार, पिकासो बग हा एक दुर्गंधीयुक्त बगसारखा कीटक आहे, जो भक्षकांना दूर राहण्याचा इशारा देण्यासाठी त्याच्या विशिष्ट खुणांचा वापर करतो.
हमिनबर्ड मॉथ
यूएस फॉरेस्ट सर्व्हिसच्या मते, दिवसा उडणाऱ्या कीटकांच्या अनेक प्रजाती जगभरात सामान्य आहेत आणि ते त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या पक्ष्यांसारखेच हलतात.
सोनेरी कासव बीटल
अमेरिकेच्या बहुतांश भागांत आढळणारे सोनेरी कासव बीटल पारदर्शक कडा असलेल्या एका लहान सोन्याच्या नाण्यासारखा दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांची चमकदार धातूची चमक कमी होते आणि मागे एक मंद लाल-पिवळा रंग राहतो.
हिरवी मिल्कवीड टोळ
हिरवी मिल्कवीड टोळ भक्षकांना इशारा देण्यासाठी त्यांचे रंगीबेरंगी पंख फडफडवते आणि ते प्रत्यक्षात खूप उपयुक्त आहे. कारण- जेव्हा त्यांना धोका असतो तेव्हा ते मिल्कवीड वनस्पतींपासून मिळवलेले द्रव स्राव करतात.
काटेरी किडा
दक्षिण फ्लोरिडामध्ये एक सामान्य किडा काट्यांसारखे दिसतो. फ्लोरिडा विद्यापीठाच्या मते, हे किडे मोठ्या समूहाने झाडाचे खोड आणि पानांचे देठ यांना चिकटून राहतात, ज्यामुळे माणसांनाही सुरुवातीला त्यांना ओळखणे कठीण जाते.