केंद्र सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आधार धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये आता ही सुविधा पुढील वर्षापर्यंत कायम राहणार असून, कोणत्याही कार्डधारकाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक केलेले नसल्यास त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे म्हटले आहे. हे काम पूर्णपणे ऐच्छिक आहे, जे एक प्रकारे फायदेशीर देखील असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारने अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, आतापर्यंत मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२३ होती, जी आता ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आधार कार्डधारकांना हे काम पूर्ण करण्यासाठी 1 पूर्ण वर्षाचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचे काम पूर्णपणे ऐच्छिक असून, ते अनिवार्य करण्यात आलेले नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. जर कोणी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र एकमेकांना जोडले नाही तर त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही कार्ड लिंक करण्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की, यामुळे योग्य मतदाराची ओळख आणि एकाच लोकसभा मतदारसंघात एकाच नावाने दोन नोंदणी करणे टाळता येऊ शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major update on voter id card and aadhaar the government extended the deadline for both vrd
First published on: 22-03-2023 at 12:20 IST