लोकप्रिय फास्टफूड पैकी एक पिझ्झा आहे. जगभरात पिझ्झा खूप आवडीने खाल्ला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पिझ्झा खायला खूप आवडतो. आता पिझ्झामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्गेरिटा. मार्गेरिटा पिझ्झा एक क्लासिक इटालियन पदार्थ आहे. ज्यामध्ये टोमॅटो सॉस, मोझेरेला चीज आणि तुळशीची पानं असतात. पण याला मार्गेरिटा पिझ्झा नाव कसं पडलं? याची १३५ वर्षांपूर्वीची रंजक गोष्ट वाचा…

मार्गेरिटा पिझ्झा हा मूळ पिझ्झा असल्याचं म्हटलं जातं. हा जगातला सर्वात पहिला पिझ्झा मार्गेरिटा असल्याचं मानलं जात. इटलीच्या नेपल्समध्ये रॉफेल एस्पिओसिटो नावाच्या व्यक्तीने मार्गेरिटा पिझ्झा बनवला होता. इतर पिझ्झाच्या तुलनेत या पिझ्झाचं पीठ खूप मऊ असतं. खमीर (यीस्ट – पाव फुगण्यासाठी वापर येणार साहित्य ), पीठ, पाणी आणि मीठ घालून मार्गेरिटा पिझ्झाचा बेस बनवला जातो.

हेही वाचा – भारतातील सर्वाधिक महागड्या पाच शाळा कोणत्या? वर्षाला घेतात लाखो रुपये

सावॉयची राणी मार्गेरिटाच्या नावावरून या पिझ्झाला नाव देण्यात आलं आहे. इटलीचा राजा अम्बर्टोची पहिली राणी मार्गेरिटा होती. दोघांनी १९८९ साली नेपल्सचा दौरा केला होता. यावेळी राणी राजेशाही कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या ठराविक फ्रेंच जेवणाला कंटाळली होती. पिझ्झेरिया ब्रँडीचे प्रसिद्ध पिझ्झाओलो म्हणजे पिझ्झा निर्माते राफेल एस्पिओसिटो यांना राणीसाठी काहीतरी वेगळं आणि स्थानिक जेवण तयार करण्याची जबाबदारी दिली.

मार्गेरिटा पिझ्झामध्ये काय आहे विशेष?

एस्पिओसिटो यांनी राणीसाठी तीन वेगवेगळे पिझ्झा बनवले. प्रत्येक पिझ्झावर वेगवेगळे टॉपिंग (भाज्या वगैरे) होत्या. यातील दोन पिझ्झा पारंपरिक शैलीने बनवले होते. पण तिसऱ्या पिझ्झाने राणीचं लक्ष वेधून घेतलं. कारण हा पिझ्झावर इटलीच्या ध्वजातील रंगानुसार एस्पिओसिटो यांनी बनवला होता. लाल रंगाचा टोमॅटो सॉस, पांढऱ्या रंगाच मोझेरेला चीज आणि हिरवी तुळशीची पानं याचा वापर करून एस्पिओसिटो यांनी राणीसाठी खास पिझ्झा तयार केला होता.

राणी मार्गेरिटाला एस्पिओसिटो यांनी केलेला तिसरा पिझ्झा खूप आवडला. तिनं एस्पिओसिटोचं खूप कौतुक केलं. राणीच्या सन्मानार्थ राफेल एस्पिओसिटोने त्याच तिसऱ्या पिझ्झाचं नाव मार्गेरिटा दिलं. या शाही कनेक्शनमुळे मार्गेरिटा पिझ्झा लोकप्रिय होण्यास खूप मदत झाली.

Photo Credit - Indian Express
Photo Credit – Indian Express

हेही वाचा –Daylight Saving Time : ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हणजे काय? जगभरात का होते चर्चा? जाणून घ्या कारण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिथे राफेल एस्पिओसिटो यांनी पहिल्यांदा राणीला मार्गेरिटा पिझ्झा पहिल्यांदा खाऊ घातला, तिथे आजही पिझ्झा मिळतो. मार्गेरिटा पिझ्झा क्लासिक असला तरी मोजक्या साहित्याने बनवला जातो. यामध्ये आता टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो, मोझेरेला चीज, तुळस आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जातो.