Expensive schools in India: शाळेमुळे मुलांना अभ्यासापासून अनेक कला, खेळ, तसेच विविध गोष्टींची ओळख होते. त्यामुळेच शाळा जेवढी चांगली तेवढी ती मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फायदेशीर ठरते. भारतात अशा अनेक शाळा आहेत, ज्या खूप चांगल्या प्रकारचे शिक्षण देतात. उत्तम दर्जाच्या शिक्षणासाठी भारत जागतिक स्तरावर ओळखला जातो. भारतातील अनेक शाळा सामान्यांना परवडतील अशा आहेत; तर काही शाळा वर्षाला लाखो रुपये शुल्क आकारणाऱ्या आहेत. या शाळांमधील शिक्षण, शाळेची वास्तू या सर्व गोष्टी सामान्य शाळांच्या तुलनेत खूप वेगळ्या असल्याचे पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वाधिक पाच महागड्या शाळा कोणत्या ते सांगणार आहोत.

भारतातील महागड्या शाळा

  • दून स्कूल

दून स्कूल ही डेहराडून, उत्तराखंड येथे असलेली शाळा भारतातील सर्वांत प्रतिष्ठित ऑल बॉईज खासगी बोर्डिंग शाळांपैकी एक आहे. १९३५ मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली. उच्चभ्रू संस्था भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (ICSE)शी ती संलग्न आहे आणि या शाळेत इयत्ता ७ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तसेच या शाळेची फी वर्षाला १० ते ११ लाख रुपये आहे.

  • सिंधिया स्कूल

सिंधिया स्कूलची स्थापना १८९७ मध्ये करण्यात आली. ही मुलांसाठी असलेली एक प्रतिष्ठित खासगी बोर्डिंग स्कूल आहे, जी ग्वाल्हेरमधील ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यात स्थित आहे. भारतीय संस्थानांतील राजे विशेषत: मराठ्यांसाठी स्थापन केलेली ही शाळा आता विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशयोग्य बनली आहे. ही शाळा वर्षाला १२ ते १५ लाख रुपये शुल्क घेते.

  • वूडस्टॉक स्कूल

वूडस्टॉक स्कूल ही भारतातील उत्तराखंडमधील मसुरीला लागून असलेल्या लांडूर येथे आहे. हे ठिकाण हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. किंडरगार्टनपासून इयत्ता १२ वीपर्यंत सर्वसमावेशक शिक्षण देत, वूडस्टॉकने १९६० मध्ये आशियातील पहिली शाळा म्हणून मिडल स्टेट्स असोसिएशनची मान्यता मिळवून इतिहास रचला. २०१९ मध्ये IB मिडल इयर्स प्रोग्राम (MYP) आणि डिप्लोमा प्रोग्राम (DP) दोन्ही ऑफर करण्यासाठी पूर्ण अधिकृतता मिळवून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील (IB) वर्ल्ड स्कूल म्हणून अधिकृत मान्यता प्राप्त करून, आपली प्रतिष्ठा अधिक मजबूत केली. ही शाळा वर्षाला १६ ते १८ लाख रुपये शुल्क आकारते.

  • गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल

गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूलची स्थापना १९७७ मध्ये झाली. हे एक बोर्डिंग स्कूल असून, ते ओटाकमुंड (उटी) येथे स्थित आहे. तमिळनाडूच्या निसर्गरम्य निलगिरी जिल्ह्यात वसलेली ही शाळा इयत्ता दुसरी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणारी ही शाळा वर्षाला सहा ते १५ लाख रुपये शुल्क आकारते.

हेही वाचा: ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली तुम्हीही करताय का ‘हश ट्रिप’? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • इकोले मोंडियाले वर्ल्ड स्कूल

इकोले मोंडियाले वर्ल्ड स्कूलची स्थापना २००४ मध्ये झाली. ही स्कूल मुंबईस्थित एक प्रतिष्ठित मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील (IB) शाळा आहे. प्री-नर्सरीपासून इयत्ता १२ वीपर्यंतचा शिक्षण दिले जाते. या शाळेचे वार्षिक शुल्क १० ते ११ लाख रुपये आहे.