निसर्ग अत्यंत अदभुत आहे. निसर्गामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. मानवी संस्कृती अस्तित्वात येण्यापूर्वी कित्येक लक्ष वर्षांपूर्वी या पृथ्वीवर अजस्र प्राणी अस्तित्वात होते. त्यापैकी एक म्हणजे डायनासमोर; पण लाखो वर्षांपूर्वीच डायनासोर नामशेष झाले. पण, डायनासमोर काळापासून अस्तित्वात असलेल्या काही प्रजाती आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. अशा प्राण्यांपैकीच एक म्हणजे खाऱ्या पाण्यातील मगर. त्यांना ‘saltwater crocodile’ किंवा ‘salties’, असेही म्हटले जाते. त्या भारत, आग्नेय आशिया व उत्तर ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या आकारमान व ताकदीसाठी त्या ओळखल्या जातात.
खाऱ्या पाण्यातील मगरी किती मोठ्या होतात?
बहुतेक प्रौढ नर मगर १७ फूट लांब व ५०० किलोग्रॅमपर्यंत वाढतात. त्यांची लांबी एका लहान बसइतक्या आकाराची असते. मादी खूपच लहान असतात; साधारणतः १० फूट. पण, काही खाऱ्या पाण्यातील मगरी आणखी मोठ्या असतात.
सर्वांत प्रसिद्ध मगर कोणती?
लोलोंग नावाचा एक प्रचंड मगर आहे, जो २०११ मध्ये फिलिपिन्समध्ये पकडला गेला होता. तो २०.२४ फूट (६.१७ मीटर) उंच आणि १,००० किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा होता! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये त्याची सर्वांत लांब मगर म्हणून नोंद झाली आहे. दुर्दैवाने, लोलोंग २०१३ मध्ये मरण पावला.
ऑस्ट्रेलियन संग्रहालय आणि नॅशनल जिओग्राफिकच्या तज्ज्ञांच्या मते, “हे मगर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हळूहळू वाढतात. म्हणून जितके त्यांचे वय वाढत जाते, तितके ते मोठे होतात. ही प्रजाती डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे.
खाऱ्या पाण्यातील मगरींना धोकादायक का मानले जाते?
खाऱ्या पाण्यातील मगरी हे सर्वोत्तम भक्षक आहेत. म्हणजेच त्यांचे स्थान अन्नसाखळीच्या वरच्या पातळीवर आहे. ते हुशार, वेगवान व अतिशय प्रादेशिक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मजबूत जबडा आणि चोरपावलांनी शिकारीच्या जवळ जाण्याची हुशारी यांमुळे ते सहजपणे शिकार करू शकतात. आणि हो कधी कधी या मगरी मानवाचीही शिकार करतात. म्हणूनच ज्या प्रदेशात या मगरी आढळतात, तेथील लोक अधिक सावध असतात.
खाऱ्या पाण्यातील मगर, असे नाव असले तरी त्या फक्त समुद्रातच राहत नाहीत. त्या प्रत्यक्षात खूपच लवचिक असतात आणि नद्या, खाऱ्या पाण्यातील खाडी, दलदल व अगदी गोड्या पाण्यातील तलावांमध्येही आढळतात. खारफुटीच्या जंगलाजवळ एखादी मगर दिसू शकते.
खाऱ्या पाण्यातील मगरींची त्यांची कातडी आणि मांसासाठी मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते आणि त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. परंतु, आता ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्स यांसारख्या देशांमध्ये कडक वन्यजीव कायद्यांमुळे त्यांची संख्या पुन्हा वाढली आहे.