Mosquitoes : पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होते आणि ही सर्वात मोठी समस्या असते. डास चावू नये यासाठी आपण बरेच उपाय करतो; तरीसुद्धा अनेकदा त्याचा काहीही फायदा होत नाही. तुम्ही खूपदा ऐकले असेल की काही लोकं म्हणतात, “मला खूप जास्त डास चावतात.” पण, खरंच इतर लोकांच्या तुलनेत एखाद्याला जास्त डास चावतात का?
काही ठराविक ब्लड ग्रुपच्या लोकांना सर्वात जास्त डास चावतात, असा दावा अनेकदा संशोधनातून करण्यात आला आहे. खरंच एखाद्या ठराविक ब्लड ग्रुपच्या लोकांनाच जास्त डास चावतात? आणि तो कोणता ब्लड ग्रुप आहे? आणि यामागे कोणते कारणे आहे? या विषयी संशोधन काय सांगते, जाणून घेऊ या.
हेही वाचा : Mumbai Cheapest Shopping Market : मुंबईचं सर्वांत स्वस्त मार्केट; येथे करा स्वस्तात मस्त मनसोक्त खरेदी
ब्लड ग्रुपचे एकूण A, B, AB, O असे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये वेगवेगळे अँटीजन्स आणि प्रोटिन्स असतात. A ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांच्या रक्तात A अँटीजन्स, तर B ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तात B अँटीजन्स असतात. AB ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांच्या रक्तात A आणि B असे दोन्ही अँटीजन्स दिसून येतात, पण O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तात A आणि B असे दोन्हीही अँटीजन्स नसतात; त्यामुळे असं म्हणतात की O ब्लड ग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात. यावर अनेकदा संशोधन करण्यात आले आहे.
१०७४ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले होते की, O ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना जास्त डास चावतात. १०२ लोकांवर हा प्रयोग करण्यात आला होता.
२००४ मध्ये केलेल्या एका संशोधनातूनही ही बाब समोर आली होती की, ज्या लोकांचा ब्लड ग्रुप O असतो, त्यांच्या अवतीभवती जास्त डास फिरतात. जेव्हा A ब्लड ग्रुप आणि O ब्लड ग्रुपची तुलना करण्यात आली तेव्हा असे समजले की, O ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांच्या रक्तातील अँटीजन्सकडे डास जास्त आकर्षित होतात.
यावर २०१९ मध्येही संधोधन करण्यात आले होते. या संशोधनातूनही O ब्लड ग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात असे समोर आले होते. डासांना O ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांच्या रक्तातील अँटीजन्स आवडतात, असे या अभ्यासातून सांगितले होते. त्यामुळे ‘O’ ब्लड ग्रुपच्या लोकांना सर्वात जास्त डास चावतात, असे म्हणतात.