Mumbai Local 4th Seat Rule: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे असे म्हणतात आणि खरोखरच यात काहीच वावगं नाही. लाखो लोकांना रोज अगदी कमीत कमी खर्चात प्रवासाची संधी उपलब्ध करून देत लोकलने आपले पैसे, वेळ दोन्ही वाचवले आहेत. याच मुंबई लोकलचे अनेक नियम आहेत. तुम्ही नेहमी प्रवास करत असाल तर ट्रेनमध्येच मोठमोठ्याने होणाऱ्या नियमांच्या घोषणा आपणही ऐकल्या असतील. तिकीट काढा, वरिष्ठ नागरिकांना राखीव जागा द्या हे तसे वैध नियम आहेत पण मुंबई लोकलमध्ये नेटाने एक अलिखित नियम पाळला जातो तो म्हणजे चौथी सीट.

मुंबई लोकलमध्ये ‘चौथ्या सीटचा’ नियम

मुंबई लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास व जनरल डब्ब्यात सहसा हा नियम पाळला जात नसला तरी महिलांच्या डब्ब्यात चौथी सीट ही विंडोपेक्षा अधिक मागणीत असते. यासंदर्भात अनधिकृत पण कठोर नियम काय आहेत हे जाणून घेऊयात.सर्वात आधी हे समजून घ्या की मुंबई लोकलच्या सीट या तीन प्रवाशांसाठी बनवलेल्या आहेत पण तुम्ही सहप्रवाशांच्या समजुतीने चौथी सीट मिळवू शकता.

  • तुम्हाला तिसऱ्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचे नीट बसून झाल्यावर उरलेल्या जागेत बसायचे आहे.
  • तुम्ही सीटवर उजव्या किंवा डाव्या बाजूला पाय ठेवून समोरच्या सीटचा आधार घेऊन बसू शकता.
  • चौथ्या सीटवर बसलेल्या व्यक्तीमुळे जाण्यायेण्याची जागा अडवली जाते. म्हणूनच प्रत्येक स्टेशनला जेव्हा अन्य प्रवाशांना त्या जागेतून जायचे असेल तेव्हा उभं राहून जागा करून द्यावी लागते.
  • खिडकीवरील सीट, दुसऱ्या/तिसऱ्या सीटवरील प्रवासी उठल्यावर, चौथ्या सीट वर बसलेली व्यक्ती सर्वात आधी आत सरकून बसू शकते.
  • जर एखाद्या प्रवाशाने पहिली/दुसरी/तिसरी सीट रिकामी झाल्यावर आपण त्याजागी बसणार असल्याचे सांगून ठेवले असेल तर त्याला आधी चौथ्या सीटवरील व्यक्तीला सरकून जागा घेऊ द्यावी लागते.

हे ही वाचा<< घड्याळ नसताना माणसं वेळ कशी ओळखायचे? ‘ही’ जुनी ट्रिक दाखवते पूर्वजांची हुशारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान लक्षात घ्या तुम्ही या अनधिकृत नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कोणीही दंड करणार नाही, पण जर तुम्हाला वाद टाळायचा असेल व पहिल्यांदा ट्रेनमध्ये आलाय का असा खजील करणारा प्रश्न ऐकायचा नसेल तर हा नियम पाळणेच हिताचे ठरेल.