पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची मुदत आणखी एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. देशातील ९.६० कोटी लाभार्थ्यांना आता आणखी एक वर्षासाठी प्रति सिलिंडर २०० रुपये सबसिडी मिळणार आहे. लाभार्थी अनुदानावर १२ सिलिंडर घेऊ शकतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत १२ सिलिंडरपर्यंत २०० रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. महागाईचा भार कमी करण्यासाठी पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत ९ कोटी लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर २०० रुपये सबसिडी देण्यात आली.

एका वर्षात १२ गॅस सिलिंडरवर २०० रुपये अतिरिक्त अनुदान

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सरकार दारिद्र्यरेषेखालील महिलांना पहिला गॅस सिलिंडर मोफत देते. एका वर्षात १२ गॅस सिलिंडरवर २०० रुपये अतिरिक्त सबसिडी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून गरीब आर्थिक वर्गातील लोकांपर्यंत एलपीजी सिलिंडरची सुविधा पोहोचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीएमध्ये ४ टक्के वाढ जाहीर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. आता डीए ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे.