New York PM Modi Hotel Room Cost: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या बहुप्रतिक्षित दौऱ्यासाठी मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. सेंट्रल पार्कपासून सुमारे १०- १२ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मॅडिसन अव्हेन्यूवरील लोटे न्यूयॉर्क पॅलेसमध्ये पंतप्रधानांचा मुक्काम असेल. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी २०१९ आणि २०१४ मध्ये न्यूयॉर्क दौऱ्यावर या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता.

राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणाला स्वीकारून मोदी २१ ते २४ जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यासाठी गेले आहेत. मोदींसाठी २२ जून रोजी एका सरकारी डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर न्यूयॉर्कहून मोदी वॉशिंग्टन डीसीला जाणार असून तेथे ते राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्याशी चर्चा करतील.

अमेरिका दौऱ्यामुळे लोकशाही, विविधता आणि स्वातंत्र्य या दोन्ही देशातील मूल्यांवर आधारित संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मोदींनी वर्तवला आहे. अमेरिकेतून मोदी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसीच्या निमंत्रणावरून इजिप्तला जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले आहेत त्यात तब्बल ७३३ अतिथी खोल्या आणि सुट आहेत. येथील टॉवर्स आणि रॉयल स्वीट्स कलेक्शनमध्ये सुद्धा राहण्याची सोय आहे. न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित हॉटेलपैकी एक असलेल्या या फाईव्ह स्टारमध्ये किंग साइज बेडसाठी दर रात्री सुमारे ४८,००० रुपयांपासून रूम भाडे सुरु होते. तर अन्य रूम ४८,००० रुपये ते १२ लाख रुपये प्रति रात्र अशा किमतीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
(Photo: http://www.lottenypalace.com)

दरम्यान, पंतप्रधान मोदी, यूएस दौऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाच्या निमंत्रणावरून यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. ठदोन्ही देशांमधील विश्वास वाढवण्यासाठी नागरिक व त्यांचे संबंध महत्त्वपूर्ण ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे,” असेही पुढे मोदींनी म्हटले होते.