Pune University History : पुणे हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. विद्येचे माहेरघर, अशीही या शहराची आणखी एक ओळख आहे. पुण्यात चांगले शिक्षण मिळते, असा अनेकांचा विश्वास आहे. हा विश्वास कमावण्यात पुणे विद्यापीठाचे महत्त्वाचे योगदान आहे. पुणे विद्यापीठाविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल; पण तुम्हाला माहीत आहे का की, पुणे विद्यापीठाची सुरुवात कुठून झाली? तुम्हाला वाटत असेल की, आज जिथे पुणे विद्यापीठ आहे, तिथूनच पुणे विद्यापीठ सुरू झाले असावे; पण तसे नाही. पुणे विद्यापीठाची सुरुवात एका वेगळ्या इमारतीतून झाली होती. ती इमारत कोणती? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत? (do you know where from pune university started)
या वास्तूत विद्यापीठाचे कार्यालय प्रथम सुरू केले
१५ एप्रिल १९४८ या दिवशी त्या वेळच्या मुंबई शासनाने डॉ. मुकुंदराव रामराव तथा बाबासाहेब जयकर यांना पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्त केले. त्यानंतर लवकरच डॉ. जयकर यांनी भांडारकर ‘प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’च्या वास्तूत विद्यापीठाचे कार्यालय प्रथम सुरू केले. येथे विद्यापीठाचे कार्यालय १ जून १९४९ पर्यंत होते. अशा प्रकारे एका आगळ्यावेगळ्या वास्तूत पुणे विद्यापीठाची सुरुवात झाली होती.
हेही वाचा : Pune Vitthal Temple : पुण्यातील या मंदिरात घडल्या असंख्य ऐतिहासिक घटना; काय आहे विठोबा मंदिराचा रंजक प्रवास; जाणून घ्या
पाहा व्हिडीओ
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा इतिहास
सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे पहिल्या पिढीतील संशोधक होते. ते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू होते. समाजसुधारणा क्षेत्रात त्यांचे नाव खूप मोठे आहे. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, कला, शिल्प, नाणी, शिलालेख, वाङमय या सर्व क्षेत्रात त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांना प्रचंड मोठा विद्यार्थी वर्ग लाभला. त्यांच्या ८० व्या वर्षी भांडारकर संस्थेची स्थापना त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली होती.
हेही वाचा : पुण्यातील अनेक अघोरी प्रथांना आळा घालणारे जंगली महाराज नक्की कोण? पुण्यातील जे.एम.रोडशी काय आहे कनेक्शन?
आपला इतिहास, आपली संस्कृती व आपले प्राचीन साहित्य हे किती मौल्यवान आहे, याची जाणीव आपल्याला आहे. प्राचीन साहित्याचा वापर आपल्याला आताच्या आधुनिक युगातही कायम होतो. पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ ही भारतातील अशीच एक संस्था. इथे अनेक हस्तलिखिते आणि दुर्मीळ पुस्तकांचा मोठा संग्रह पाहायला मिळतो.