बहुतांश लोक कोणताही खाद्यपदार्थ खाताना त्याची एक्सपायरी डेट पाहत नाहीत. मात्र एखाद्या पदार्थाची एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर एक दोन दिवसांनी तो पदार्थ खाल्ल्यानंतर काहीही होत नाही. पण काही एक्सपायरी पदार्थ खाऊन काहीजण आजारी पडतात. अशा परिस्थितीत एक्स्पायरी डेट संपल्यानंतर एखादा पदार्थ सेवन करणे योग्य आहे का, तसेच ते आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? अशा अनेक प्रश्नांवर तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घेऊ…
एक्सपायर झालेले पदार्थ खाऊ शकतो का?
आहार तज्ज्ञांच्या मते, एक्सपायरी डेटनंतर एक किंवा दोन दिवसांनी एखादा पदार्थ खाणे हानिकारक ठरू शकत नाही. यावर आहार तज्ज्ञ जेन फॅलेनवर्थ सांगतात की, अशा पदार्थांचे सेवन केल्याने सहसा कोणतीही समस्या उद्भवत नाही. अनेक खाद्यपदार्थ एक्सपायरी डेटनंतर कोणतेही दुष्परिणामांशिवाय खाता येतात. पण याचा अर्थ असा नाही की, एक्सपायर झालेले पदार्थ सेवन पूर्णपणे सुरक्षित आहे.
एक्सपायर्ड पदार्थ खाल्ल्यास काय होऊ शकते?
फॅलेनवर्थ यांच्या मते, एक्सपायर पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे शरीर हानिकारक बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊ शकतात. यामुळे मळमळ, अतिसार आणि ताप यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे कोणताही पदार्थ ‘बेस्ट बिफोर’ च्या आधी आणि एक्सपायरी डेटच्या दोन, तीन दिवसांनी खाणे योग्य आहे, यामुळे तुमचे कोणतेही मोठे नुकसान होणार नाही.
कोणत्याही खाद्यपदार्थांवर तीन प्रकारच्या तारखा असतात. एक म्हणजे बेस्ट बिफोर डेट, दुसरी द सेल बाय डेट आणि तिसरी यूज्ड बाय डेट. या सर्व तारखा उत्पादनाची उत्कृष्ट चव आणि ताजेपणा सुनिश्चित करण्यासाठीचा वेळ सूचित करतात.
तज्ज्ञांच्या मते, शेल्फ-स्थिर खाद्यपदार्थ, तसेच गोठवलेले पदार्थ, कालबाह्य तारखेनंतर काही दिवसांनीही सेवन करणे सुरक्षित असू शकते.
फूड पॉइजनिंग कसे होते?
आहार तज्ज्ञांच्या मते, खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपल्यानंतर ते बरेच दिवसांनी खाल्ल्याने तुम्ही हानिकारक बॅक्टेरियाच्या संसर्ग येऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला फूड पॉइजनिंग होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला थंडी वाजून ताप येणे, पोटात दुखणे, अतिसार, मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसू शकतात. म्हणूनच एक्सपायर झालेले पदार्थ खाणे सहसा टाळावे.