भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी नाक टोचण्याची परंपरा असली तरी सध्या फॅशन म्हणून कान, नाक इतकेच काय जीभ टोचण्याचे प्रकारही वाढले आहेत. नाकाच्या दोन्ही पडद्यांबरोबरच मधल्या नाकपुड्यांमध्ये टोचण्याची मोठी ‘क्रेझ’ तरुणाईमध्ये दिसून येते. त्यासाठीचे ‘पिअर्सिंग स्टुडिओ’ (Piercing studio) आता अनेक ठिकाणी दिसतात; शिवाय तुम्हालादेखील तुमच्या आसपास अनेक लोक असे दिसत असतील, ज्यांना कान, नाक किंवा शरीराचा इतर भाग टोचून घेण्याची आवड असते. परंतु, परंपरा किंवा फॅशन म्हणून कान, नाक टोचून घेताना ते कशा प्रकारे टोचणे शरीरासाठी सुरक्षित असू शकते याबाबतची सविस्तर माहिती ‘बॉडी कॅनव्हास पिअर्सिंग स्टुडिओ’चे मालक विकास मलानी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली आहे ती जाणून घेऊ.

विकास मलानी हे दिवसाला पाच ते १५ पिअर्सिंग करतात. त्यांनी या कामाची सुरुवात कान, नाक टोचण्यापासून केली होती; जे आता जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त पिअर्सिंग करू शकतात. त्यामध्ये ते केवळ कान ३० पद्धतीने टोचू शकतात. ते पारंपरिक, पंक, गॉथिक, सांस्कृतिक व क्यू अशा विविध पद्धतींनी पिअर्सिंग करतात. मलानी हे मुंबईत हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना त्यांना बॉडी पेंटिंगची आवड निर्माण झाली होती. युरोप-अमेरिकेदरम्यान प्रवास करताना ते पिअर्सिंग आर्टिस्ट बनण्यासाठी प्रेरित झाले. त्यानंतर त्यांनी तिथे टॅटू आणि पिअर्सिंग पार्लरमध्ये अ‍ॅप्रेंटिस म्हणून काम केले. २००४ मध्ये भारतात परतल्यानंतर बॉडी कॅनव्हास नावाचा स्वत:चा स्टुडिओ सुरू करण्याआधी त्यांनी न्यूयॉर्क शहरातील एका तज्ज्ञ व्यक्तीकडे प्रशिक्षण घेतले.

हेही वाचा – सावधान! तुम्हालाही Whats Appवर परदेशी नंबरवरून कॉल किंवा मेसेज येतोय का? कशी होते फसवणूक, जाणून घ्या… 

मलानी यांच्या कामाची एक चांगली पद्धत अशी आहे की, ते त्यांचा स्टुडिओ सुरक्षित आणि स्वच्छ आहे का याची खात्री करतात. ते म्हणाले, “भारतातील लोक कान, नाक टोचण्याचे काम हे सोनाराचे असल्याचे मानतात. त्यामुळे मला असं जाणवलं की, हे काम निरोगी आणि सुरक्षित पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे.” अनेक सोनारांप्रमाणे मलानी हेदेखील पूर्ण निर्जंतुकीकरण उपकरणे वापरतात. सुयांचा एकदाच वापर करतात किंवा त्यांचे निर्जंतुकीकरण करतात, शिवाय त्यांची उपकरणे उद्योग स्वच्छता मानकांशी जुळतात.

ते म्हणाले, “शरीर टोचणं (Piercing) हे एक शास्त्र आहे आणि ते काम करणाऱ्यांनी एक कलाकार म्हणून मानवी शरीराला शारीरिकदृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे. तसेच मानवी शरीराचा नाजूकपणा आणि रचना लक्षात घेता, टोचण्यासाठी पिअर्सिंग गन वापरण्याऐवजी मी सुयांचा वापर करतो.” तसेच ग्राहकांना भेटल्यानंतर मलानी सुरुवातीला त्यांना विचारतात, “पिअर्सिंग का करायचं आहे?” त्यामुळे त्यांना त्यांच्या ग्राहकाबरोबर योग्य पद्धतीने काम करता येते आणि काम करण्यास मदतही होते. यावेळी ते ग्राहकाने काही खाल्ले आहे का? तसेच त्याने ड्रग्ज किंवा दारूची नशा केली नाही ना याचीही ते खात्री करून घेतात. त्यासह ते ग्राहकांची आणखी काही सुरक्षा तपासणी करतात.

हेही वाचा- भक्ष्याचा पाठलाग करताना वाघ किंवा सिंहांना काटे टोचत नाहीत का? काटेरी झुडूपात पंजाचं संरक्षण कसं होतं?

ग्राहकाच्या शरीरावर पिअर्सिंगला सुरुवात केली की, मलानी ग्राहकांना हसवण्याचा, त्यांना त्रास होणार नाही असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात; शिवाय आपण असं केलं नाही, तर ग्राहक स्पर्शदेखील करू देणार नाहीत, असं मलानी म्हणाले. काम करताना ते ग्राहकांना बोलण्याद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अनेक बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटर्स आता त्यांचे ग्राहक आहेत.

मलानी सामान्यतः कान, नाक टोचतात; ज्याची किंमत सुमारे दीड हजार रुपये आहे. परंतु, शरीराचा एखाद्या नाजूक भागी टोचण्यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता असते आणि तिथे अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, मणक्याच्या बाजूची त्वचा; अशा ठिकाणी टोचण्यासाठी ते १० हजार डॉलर (भारतीय चलनामध्ये जवळपास ८ लाखांहून अधिक) घेतात. मलानी यांचे असे म्हणणे आहे की, पिअर्सिंग क्षेत्राची भारतीय बाजारपेठ हळूहळू का होईना वाढत आहे! शिवाय अलिकडे भुवया, नाक व कान टोचण्याच्या बाबतीतील लोकप्रियता वाढत आहे. विशेषतः LGBTQ समुदायात भुवया टोचण्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अनेक महिलांनी अंगठी घालण्याच्या बोटांवर हिऱ्यानं भरलेले स्टड टोचण्यास सुरुवात केली असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, शरीरात सुई टोचून घेण्याची भीती वाटणाऱ्यांना मलानी सल्ला देतात की, तुम्ही व्यावसायिक स्टुडिओत जा; ज्यांना हे काम करण्याचा अधिक अनुभव आहे. जे या कामात कुशल असतात, त्यांचाच या क्षेत्रात निभाव लागतो.

Story img Loader