देशात अनेक मोठ्या कंपन्या व्यवसाय करत आहेत. त्यातील काहींचा व्यवसाय देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा कंपन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतात सर्वाधिक टॅक्स भरतात. Ace Equity वर उपलब्ध आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२२ (FY२२) मध्ये अशा १५ लिस्टेड कंपन्या आहेत, ज्यांनी किमान ५००० कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. त्याच वेळी, एकूण ६० कंपन्या होत्या ज्यांनी किमान १००० कोटी रुपयांचा टॅक्स भरला होता.

मुंबईतील मुकेश अंबानी आहेत पहिल्या क्रमांकावर..

आर्थिक वर्ष २०२२ च्या आकडेवारीनुसार, अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये १६,२९७ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. एसबीआयने १३,३८२ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने १३,२३८ कोटी रुपयांचा टॅक्स भरला. याशिवाय टॅक्स भरण्याच्या बाबतीत HDFC बँक १२,७२२ कोटी रुपयांच्या कर भरणासह चौथ्या स्थानावर आहे. वेदांताने ९,२५५ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे.

JSW स्टीलने ८,८०७ कोटी रुपये आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ८,५६२ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. यानंतर ८,४७८ कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या टाटा स्टीलचा क्रमांक लागतो. ICICI बँकेने ८,४५७ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. या यादीत भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) दहाव्या स्थानावर आहे. ज्यांनी ८,०१३ कोटी रुपयांचा कर भरला होता.

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ नदीला स्पर्श करायलाही लोकं घाबरतात; यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकराव्या क्रमांकावर इन्फोसिसने ७,९६४ कोटी रुपयांचा टॅक्स भरला. कोल इंडियाने ६,२३८ कोटी रुपये, हिंडाल्को इंडस्ट्रीजने ५,३७३ कोटी, आयटीसीने ५,२३७ कोटी आणि एनटीपीसीने ५,०४७ कोटी रुपये टॅक्स भरला.