Ginger Ale : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निमंत्रित पाहुण्यांसाठी स्टेट डिनरही आयोजित करण्यात आलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेला हा शानदार कार्यक्रम सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांनी एक ड्रिंक घेऊन चिअर्स केलं. Ginger Ale असं या ड्रिंकचं नाव होतं. हे ड्रिंक नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला, आम्हाला पडलाच असेल. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो आहोत.
जो बायडेन यांनी काय म्हटलं आहे?
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि जो बायडेन यांच्यासाठी हे ड्रिंक आलं. त्यानंतर लगेचच बायडेन यांनी दिलं की, “एक बाब चांगली आहे की आम्ही दोघंही हे जे ड्रिंक घेतोय त्यात अल्कोहोल नाही. “
काय आहे Ginger Ale ?
Ginger Ale जिंजर अॅले हे असं ड्रिंक आहे ज्यात सोडा मिसळला लागतो. हे ड्रिंक आल्याच्या स्वादाचं असतं त्यामुळे याला जिंजर अॅले असं म्हटलं जातं. हे ड्रिंक साधारण सॉफ्ट ड्रिंकसारखंच असतं. हे ड्रिंक कशातही मिसळून पित नाही. हे पेय सरळ प्यायलं जातं. काही लोक हे पेय दुसऱ्या पेयांमध्ये मिसळूनही पितात. या ड्रिंकमध्ये दोन प्रकार असतात एक रेग्युलर किंवा गोल्डन आणि दुसरं ड्राय. बहुतांश लोक हे ड्रिंक तसंच पितात. त्यात काहीही मिसळत नाहीत. जिंजर अॅले या ड्रिंकमध्ये सायट्रिक अॅसिड आणि सोडियम बेंझोनेट असे प्रिझर्व्हेटिव्ह असतात.
स्टेट डिनरच्या मेन्यूत काय होतं?
डिनरच्या मेन्यूमध्ये मॅरिनेट बाजरी, मक्याचं सॅलेड, भरवां मशरूम, टरबूज, तिखट अॅव्हीकॉडो सॉस, पोर्टेबलो मशरूम या पदार्थांचा समावेश होता. तसंच गोड पदार्थांमध्ये गुलाब वेलचीचे स्ट्रॉबेरी शॉर्ट केक आणि इतर अनेक पदार्थ होते. या डिनरचा सगळ्यांनीच आस्वाद घेतला.