ट्रेनने प्रवास करताना आपल्याला ट्रेनच्या यंत्रणेबाबत अनेक प्रश्न पडतात. एवढी मोठी यंत्रणा रोज सुरळीत कशी काम करते असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. ट्रेनने प्रवास करताना त्याच्या डब्ब्यांवर लिहलेले SA, 1A, 2A असे कोड्स तुम्ही पाहिले असतील. या कोड्सचा अर्थ काय असतो हे अनेकांना माहित नसते. ट्रेनच्या डब्ब्याचा प्रकार या कोड्समधून सांगण्यात येतो. जाणून घ्या काय असतो या कोड्सचा अर्थ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेनच्या डब्ब्यांवर असणाऱ्या कोड्सचा अर्थ

आणखी वाचा: सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित

SL
याचा अर्थ ट्रेनचा डब्बा स्लीपर क्लास आहे. स्लीपर क्लासमध्ये ७२ ते ७८ सीट्स असतात. यामधील सीट कॉन्फिगरेशन ३+३+२ असे असते.

1A
याचा अर्थ ट्रेनचा डब्बा फर्स्ट क्लास एसी आहे. शताब्दी एक्सप्रेस मध्ये या कोडला एक्झिक्यूटिव्ह क्लास किंवा एसी या नावांनी ओळखले जाते.

2A
याचा अर्थ ट्रेनचा डब्बा सेकंड क्लास एसी आहे. याला एसी 2 टायर या नावाने देखील ओळखले जाते.

3A
याचा अर्थ ट्रेनचा डब्बा थर्ड एसी आहे. स्लीपर क्लासमध्ये जो एसी असतो त्यासाठी 3A वापरले जाते.

आणखी वाचा: गुडघ्यावर बसून का केलं जात प्रपोज? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

2S
याचा अर्थ सेकंड सीटिंग असतो. सेटिंग क्लास मधील याची तिकीट सर्वात स्वस्त असते. यामध्ये ६ सीट असतात.

CC
याचा अर्थ असतो एसी चेअर कार, यामध्ये 2+3 अशी बसण्याची व्यवस्था असते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the reason behind different codes written on train know the meaning of it pns
First published on: 17-12-2022 at 15:38 IST