Indian Railway: तुम्ही कित्येक रेल्वे स्टेशनचे नाव ऐकले असतील ज्यामध्ये काहींच्या नावमागे सहसा सेंट्रलस टर्मिनल किंवा मार्गाचा उल्लेख केला जातो. कित्येकांना याचा अर्थ देखील माहित नसतो. पण तुम्ही कधी असे स्टेशनचे नाव पाहिले आहे का ज्याच्या शेवटी पीएच (PH) लिहिलेले असते.

कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी असे स्टेशन पाहिले असतील पण बहूतेक लोकांना याचा अर्थ माहित नसेल. असे स्टेशन तसे फार कमी दिसतात पण प्रश्न असा पडतो की, पीएच म्हणजे काय आणि स्टेशनच्या नावामागे पीएच का लिहितात?चला तर मग जाणून घेऊ या

काय आहे पीएचचा अर्थ

पीएच या शब्दाचा अर्थ पंसेजर हॉल्ट. जेव्हा कोणत्याही स्टेशनवर पीएच लिहिले असते त्याचा अर्थ असतो की त्या स्टेशनवर फक्त पॅसेंजर ट्रेन थांबतात. असे स्टेशन इतरांपेक्षा थोडे खास असतात. कारण येथे रेल्वेतर्फे कोणताही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही. पॅसेंजर हॉल्ट डी क्लासचे स्टेशन असतात. ट्रेनला थांबण्याचा संकेत देण्यासाठी येथे कोणताही सिग्नल नसतात.

हेही वाचा – Indian Railways : रेल्वेचा तिकीट रिझर्व्हेशन फॉर्म भरताय? मग ‘या’ गोष्टींची माहिती भरायला विसरू नका

सिग्नलशिवाय या स्टेशनवर कशा थांबतात ट्रेन

आता प्रश्न असा पडतो की, जर स्टेशनवर सिग्नलच नसतो तर येथे ट्रेन थांबतात कशा? खरेतर या ट्रेनच्या ड्रायव्हरला अशा स्टेशनवर ट्रेन फक्त २ मिनिटांसाठी थांबण्याची सूचना मिळते. लोको पायलट त्यांच्या विवेकबुद्धीनुसार २ मिनिटांचा अंदाज घेऊ या स्थानकांवर ट्रेन थांबवतात.

हेही वाचा – गाडीवर लावल्या जाणाऱ्या ‘या’ रंगीबेरंगी झेंड्यांचे धार्मिक महत्त्व माहितेय का? या झेंड्यांवर नेमके काय लिहिलेले असते जाणून घ्या

तिकीट कोण देते?

आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की जर येथे कोणीही रेल्वे कर्मचारी नाही तर मग तिकिट कोण देते? अशा डी क्लास स्टेशनवर रेल्वे स्थानिक व्यक्तीची तिकीट विक्री करण्याचे कॉन्ट्रक्ट किंवा कमीशनच्या आधारावर नियुक्ती करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी होतेय अशा स्टेशनची संख्या

अशा स्टेशनची संख्या जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. रेल्वेला अशा स्टेशनमुळे काही खास उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे रेल्वे अशा स्टेशनकडे फारसे लक्ष देखील देत नाही. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक लोकांच्या मागणीमुळे स्टेशन चालू ठेवावे लागते किंवा बंद पडल्यास पुन्हा सुरु करावे लागते.