Who Invented Blue Jeans : कॉलेज, शाळा, बर्थडे पार्टी किंवा अगदी फिरायला जाताना एखादा फॅन्सी टॉप किंवा कुर्ती घातली की, त्याच्याखाली आपण आवर्जून ‘ब्ल्यू जीन्स’ ही घालतोच. ब्ल्यू जीन्स आता आपल्या रोजच्या जीवनातील एक भाग झाली आहे. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की सगळ्यात पहिला ही ब्ल्यू जीन्स का आणि कोणी बनवली असेल? तर याचबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊया…
जीन्स म्हणजे ‘डेनिम’ नावाच्या मटेरियलपासून बनवलेले पॅन्ट; जे फ्रेंच शहरातील निम्स (Nîmes) शहरात विकसित करण्यात आले. खरं तर, डेनिमला त्याचे नाव त्या ‘द निम्स’ या शहरावरूनच पडले आहे. पूर्वी डेनिम पँट इटलीमध्ये बनवले जात होते आणि जेनोआच्या बंदरातून विकले जात होते. जेनोआच्या नौदलाला त्यांच्या खलाशांसाठी टिकाऊ पँटची आवश्यकता होती. त्यामुळे डेनिमच्या पँट बनवल्या जायच्या आणि त्या चांगल्या प्रकारे टिकून सुद्धा राहायच्या.
तसेच ‘ब्लू जीन्स’ हा शब्द ‘ब्ल्यू डी गेन्स’ पासून आला आहे ज्याचा अर्थ ‘ब्ल्यू ऑफ जेनोआ’ असा होतो. १८०० च्या दशकात युरोपमध्ये लोकप्रिय असलेले निळ्या रंगाच्या डेनिम वर्क पॅन्ट आधुनिक अमेरिकन निळ्या जीन्ससारख्या नव्हत्या. पण, आता आपण ज्याला ब्ल्यू जीन्स म्हणून ओळखतो त्याचा विकास दोन उद्योजक स्थलांतरितांनी केला होता.
ब्ल्यू जीन्सचा विकास दोन उद्योगजकांनी केला (History Of Blue Jeans) :
१८५० च्या दशकात कॅलिफोर्नियामध्ये, ‘लेव्ही स्ट्रॉस’ नावाचा एक जर्मन ड्राय गुड्स व्यापारी स्थानिक कामगारांना निळ्या डेनिम वर्क पॅन्ट विकत असे. त्याच्या ग्राहकांपैकी एक, ‘जेकब डेव्हिस’ नावाचा एक लॅटव्हियन शिंपी, नियमितपणे त्याच्या लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीच्या व्यवसायासाठठी कापड खरेदी करत असे.
जेव्हा जेकब डेव्हिसच्या एका ग्राहकाने त्याच्या पॅन्ट फाटल्याबद्दल वारंवार तक्रार केली, तेव्हा जेकब डेव्हिसने पॅन्टचे खिसे आणि शिवणकाम मजबूत करण्यासाठी तांब्याच्या रिव्हेट्स वापरण्याची कल्पना सुचली. त्याला त्याची कल्पना पेटंट ( उत्पादनाची अनधिकृत आयात) करायची होती. पण, पेटंट मिळविण्यासाठी आवश्यक असलेले पैसे ($68) त्याच्याकडे नव्हते.
अखेर, जेकब डेव्हिस याने लेव्ही स्ट्रॉसशी संपर्क साधला आणि त्यांना एकत्र व्यवसाय करण्याचा येण्याचा सल्ला दिला. लेव्ही स्ट्रॉसच्या आर्थिक पाठिंब्याने, त्यांना २० मे १८७३ रोजी यूएस पेटंट १३९,१२१, इम्प्रूव्हमेंट इन फास्टनिंग पॉकेट-ओपनिंग्ज” मिळाले. काही जण याच दिवसाला ‘ब्लू जीन्सचा अधिकृत वाढदिवस’ समजतात.
‘वेस्ट ओव्हरऑल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रिव्हेटेड पॅन्ट कामगारांमध्ये लगेचच लोकप्रिय झाल्या. स्ट्रॉसने लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को प्लांटमध्ये रिव्हेटेड पॅन्टच्या उत्पादनाची देखरेख करण्यासाठी डेव्हिसला नियुक्त केले. लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनी ही जवळजवळ २० वर्षे रिव्हेटेड कपडे बनवणारी एकमेव कंपनी होती. पण, जेव्हा त्यांचे पेटंट कालबाह्य झाले, तेव्हा डझनभर इतर उत्पादकांनी त्यांच्या कपड्यांची कॉपी करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत, लोक नियमितपणे निळ्या जीन्सला “लेव्हीज” म्हणून संबोधत असत, हे नाव कंपनीने अखेर ट्रेडमार्क केले.
जरी वर्क पँट म्हणून ही जीन्स डिझाइन केली असली तरीही, १९५० च्या दशकात जेम्स डीन यांनी ‘रेबेल विदाऊट अ कॉज’ या चित्रपटात ब्लू जीन्स परिधान केल्यानंतर ते लोकप्रिय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनले. त्यांची लोकप्रियता वाढतच गेली आणि आज ते युनायटेड स्टेट्स आणि जगभरातील अनेक देशांमध्ये नियमितपणे कॅज्युअल ड्रेस म्हणून परिधान केले जातात.
डेनिम आणि धातूच्या छोट्या तुकड्यांना जगातील सर्वात लोकप्रिय कपड्यांमध्ये रूपांतरित करणाऱ्यांनी कधी कल्पना केली नसे की, ते इतके प्रसिद्ध होतील. इतके कोणतेही कपड्यांचे उत्पादन आतापर्यंत ब्ल्यू जीन्स इतके प्रसिद्ध झाले नाही.
ब्लू जीन्सबद्दल महत्त्वाच्या गोष्टी…
१. स्पेनमध्ये निळ्या जीन्सला व्हॅकेरोस (काउबॉय) किंवा तेजानोस (टेक्सन्स) म्हणून ओळखले जाते.
२. जीन्स सहसा इंडिगो रंग वापरून निळ्या रंगात रंगवल्या जातात. गुलाबी, पिवळा, काळा आणि पांढरा असे जीन्सचे इतर रंग जीन्ससारखे दिसणारे इतर कापड रंगवून तयार केले जाऊ शकतात.
३. उत्तर अमेरिकेतील रहिवाशांकडे सात जोड निळ्या जीन्सचे असतात.
४. १८८५ मध्ये जीन्सची किंमत सुमारे १.५० डॉलर (आज अंदाजे $३७) होती