who took gandhiji picture : महात्मा गांधी यांना आपण रोजच पाहतो नाही का? रोजच्या चलनात ज्या नोटा आपण वापरतो त्यावर आहे की गांधीजींचा फोटो. मात्र हा फोटो कुणी काढला, कुठे काढला हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला भारतीय चलनांवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता. मात्र, नंतरच्या काळात आधी काही नोटांवर आणि कालांतराने सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो दिसला. महात्मा गांधी तत्कालीन म्यानमार आणि भारताचे ब्रिटिश सचिव फ्रेडरिक पॅथिक लॉरेन्स यांना कोलकात्यातील ‘व्हाईसराय हाऊस’मध्ये भेटले होते. त्याच ठिकाणी महात्मा गांधींचा एका ‘अज्ञात फोटोग्राफर’ने फोटो काढला होता. त्यावरूनच नोटांवरील फोटो घेण्यात आला.

सर्वात पहिल्यांदा नोटांवर गांधीजींचा फोटो कधी छापला?

१९६९ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त एक रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो छापला. त्यानंतर १८ वर्षांनी म्हणजेच १९८७ मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेली ५०० रुपयांची नोट छापण्यात आली. पुढे १९९६ मध्ये सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.

हेही वाचा – Photos: महात्मा गांधींचा नोटांवरील हसरा फोटो नेमका केव्हाचा? तो कोणी आणि कुठे काढलाय? चलनी नोटांवर कधीपासून छापतात?

भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो का?

रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा छापल्या जाऊ नये म्हणून भारतीय चलनावर अनेक ऐतिहासिक चिन्हं आणि चित्रे घेतली होती. मात्र, कोणत्याही निर्जीव वस्तूचं चिन्ह किंवा फोटोची नक्कल करणं आणि बनावट नोटा तयार करणं तसं तुलनेने सोपं होतं. त्यामुळेच बनावट नोटांवर प्रतिबंध घालण्यासाठी गुंतागुंतीची रचना असलेल्या मानवी चेहऱ्याचा वापर करावा असा विचार पुढे आला.

नोटांवर मानवी चेहऱ्याचा फोटो छापण्याचा विचार पुढे आल्यानंतर नेमका कुणाचा फोटो छापायचा यावरही अनेक चर्चा झाल्या. यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र, बहुतांश स्वातंत्र्यसैनिकांची देशाच्या ठराविक भौगोलिक भागात ओळख होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच कारणाने ठराविक भौगोलिक भागातील ओळख असलेल्या व्यक्तीचा फोटो छापल्यास वाद होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली. या तुलनेत महात्मा गांधी संपूर्ण देशात ओळखला जाईल असा चेहरा होता. त्यामुळे नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला.