scorecardresearch

डास नेहमी कानाजवळच का गुणगुणतात? यामागचे कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

डास जवळपास प्रत्येक घरात असतात आणि तुम्ही त्यांना कधी ना कधी तुमच्या कानाजवळ फिरताना घालताना पाहिलं असेल, पण ते फक्त कानाजवळच का फिरतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?

डास नेहमी कानाजवळच का गुणगुणतात? यामागचे कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

रात्रीच्या वेळी आपण गाढ झोपेत असताना अचानक आपल्या कानाजवळ काहीतरी गुणगुणल्याचा आवाज येतो. हे दुसरे तिसरे काही नसून डास असतात जे आपल्या कानाजवळ फिरत असतात. ते आपल्या कानाच्या ठिकाणी येऊन गुणगुणत करतात ज्यामुळे आपली झोपमोड होते. पण हे डास नेहमी कानाच्या ठिकाणीच का फिरतात याबद्दल तुम्हाला माहित आहे का? खरं तर यामागे एक कारण आहे जे जाणून तुम्ही थक्क व्हाल..

डास चावल्याने केवळ खाज सुटत नाही तर अनेक आजारांचा धोकाही वाढतो. त्यांना पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो पण ते काही केल्या कमी होत नाहीत. शेवटी फिरून फिरून ते कानाजवळच गुणगुणत करतात. परंतु यामागे अनेक मनोरंजक कारणे आहेत. या संदर्भात कीटक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, डास शरीराच्या त्या भागाकडे जास्त आकर्षित होतात ज्यांना जास्त वास येतो. यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल परंतु हे सत्य आहे. कान हे आपल्या शरीरातील सर्वात घाणेरड्या जागेपैकी एक आहे आणि म्हणूनच त्याच्या वासामुळे डासांना त्याच्या आसपास राहणे आवडते.

डास तब्बल २५० वेळा…

संशोधकांच्या मते, जेव्हा आपण झोपतो डास अचानक येऊन आपल्या कानाजवळ फिरतात आणि सतत गुणगुणतात. पण हा येणारा आवाज डास करत त्यांच्या पंखाच्या तीव्र वेगामुळे येतो.तज्ञांच्या मते, एक डास प्रति सेकंद २५० वेळा पंख फडफडू शकतो, तर डास एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अशाप्रकारेच आवाज काढतात.

(हे ही वाचा: मॉल मधील टॉयलेटचा दरवाजा खालून उघडा का असतो? यामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल)

याव्यतिरिक्त, आपल्या शरीरातील उष्णता आणि घाम डास आपल्याजवळ येण्यास प्रवृत्त करतात, तसंच झोपेच्या वेळी आपण श्वासामार्गे सोडलेला कार्बनडाय ऑक्साईड यामुळे डास डोक्यावर फिरू लागतात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 20:40 IST

संबंधित बातम्या