हिवाळ्यात डासांचा वावर प्रचंड वेगाने वाढतो. तुमच्या घरात देखील डासांनी नक्कीच हजेरी लावली असेल. संध्याकाळ झाली की डास अवतीभवती फिरू लागतात. इतकंच नाही तर तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही संध्याकाळी कुठेतरी बसलेले किंवा उभे असता तेव्हा तुमच्या डोक्यावर डासांचा थवा फिरू लागतो. हे बहुतेकवेळा मोकळ्या जागेत घडते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, डास तुमच्या डोक्यावर घिरट्या का घालतात? यामागील नेमके कारण काय? यात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी बहुतांश डास आपल्याला चावतही नाहीत. फक्त डोक्यावर फिरत असतात. तर आज आम्ही तुम्हाला डास नेमके असे का करतात याबद्दल रंजक माहिती देणार आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…म्हणूनच डास डोक्याच्या वर फिरत राहतात

जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते तेव्हा ऑक्सीजन आत घेते आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडते. या कार्बन डायऑक्साइड वायूने ​​आकर्षित होऊन डास आपल्या डोक्यावर घिरट्या घालू लागतात. याशिवाय घाम येणे हे देखील याचे आणखी एक कारण आहे. घामामध्ये आढळणाऱ्या ऑक्टेनल नावाच्या रसायनाकडे आकर्षित होऊनही डास डोक्यावर घिरट्या घालू लागतात. घाम शरीरापेक्षा डोक्यावर जास्त काळ टिकतो. यामुळेच डास शरीराच्या इतर भागावर नसून फक्त डोक्यावर फिरतात.

सर्व डास चावत नाहीत

डासांचा इतका मोठा थवा आपल्या डोक्यावर घिरट्या घालत असूनही, त्यापैकी बहुतेक डास आपल्याला चावत नाहीत ते फक्त फिरत असता. ही खरी तर आश्चर्याची गोष्ट आहे. मात्र, यामागील खरं कारण म्हणजे, आपल्याला फक्त मादी डास चावतात. मादी डासांबरोबरच नर डासही डोक्यावर घिरट्या घालणाऱ्या कळपात मोठ्या प्रमाणात असतात, पण ते चावत नाहीत. रात्री झोपतानाही नर डास नसून फक्त मादी डास आपल्याला चावतात. त्यामुळे डोक्यावर बसणारे काही डास आपल्याला चावतात तर काही चावत नाहीत.

( हे ही वाचा: मोराचे अश्रू पिऊन खरंच लांडोर गर्भवती होते का? काय आहे यामागील सत्य, पाहा Viral फोटो)

डास चावल्याने अनेक आजार होतात

डास चावल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ज्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, जपानी एन्सेफलायटीस हे आजार मुख्य आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी आजूबाजूला स्वच्छता असणे आवश्यक आहे आणि पाणी साचू देऊ नये. जर तुम्ही आजारी पडलात तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा कारण जर तुम्ही या आजारांमध्ये निष्काळजीपणे वागलात तर ते खूप घातक ठरू शकते. म्हणूनच आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do mosquitoes start hovering over your head in the evening know the reason behind this fact about mosquitoes gps
First published on: 26-12-2022 at 16:08 IST