जर कोणी तुम्हाला दुपारी १.३० किंवा २.३० वाजताची वेळ विचारली आणि तुम्ही त्याला गमतीने साडे एक किंवा साडे दोन सांगितले तर तुमच्या समोरची व्यक्ती काही सेकंदांसाठी गोंधळून जाईल. आपण हे अनेकदा चेष्टेत करतो. पण असे का होते याचा कधी विचार केला आहे का? म्हणजे जेव्हा घड्याळात ३.३० किंवा ४.३० वाजतात, तेव्हा आपण साडे तीन किंवा साडे चार वगैरे म्हणतो. मग आपण दीड किंवा अडीच वाजता साडे एक किंवा साडे दोन का म्हणत नाही? यामागचं तुम्हाला कारण माहिती आहे का? नसेल तर घ्या जाणून…

हेही वाचा- NH4, NH32, NH68…राष्ट्रीय महामार्गांना हे आकडे कसे दिले जातात? कुठला क्रमांक कुठल्या रस्त्याला हे कसं ठरतं?

हा उच्चार केवळ वेळेपुरताच मर्यादित नाही, तर आपण हिशेबात किंवा पैशाच्या व्यवहारात याचा वापर करतो. १५० आणि २५० रुपयांना एकशे पन्नास रुपये किंवा अडीचशे रुपये म्हणतो. त्याचप्रमाणे दीड किलो, अडीच किलो, दीड मीटर, अडीच मीटर, दीड लिटर, अडीच लिटर इत्यादी बोलले जातात. हे आपल्या भारतीयांच्या व्यवहारात रुजले आहे. आपल्या तोंडातून साडे एक किंवा साडे दोन बाहेर पडत नाही. असा उच्चार करण्यामागचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे.

हेही वाचा- दैनंदिन वापरातील गूळ नेमका कसा तयार होतो माहिती आहे का? वाचा…

भारतीय मोजणी पद्धतीमध्ये दीड आणि अडीच व्यतिरिक्त, एक आणि चतुर्थांश, अशा अनेक संख्या आहेत. हे शब्द अपूर्णांकात गोष्टींचे वर्णन करतात. आधीच्या पिढीला ‘चतुर्थांश’,’सव्वा’, ‘पाऊणे’, ‘दीड’ आणि ‘अडीच’ चे पाढे शिकवले गेले. भारतात प्राचीन काळापासून याचा वापर होत आहे. आता प्रश्न पडतो की हा अंश काय आहे. तर आपण हे देखील समजून घेऊया.

हेही वाचा- ‘गौडबंगाल’ हा शब्द मराठी भाषेला कसा मिळाला? काय आहे नेमका अर्थ? 

अपूर्णांक ही एक संख्या आहे जी पूर्ण संख्येचा भाग दर्शवते. म्हणजे दोन पूर्ण संख्यांचा भागांक हा अपूर्णांक आहे. उदाहरणार्थ, जर ३ ला २ ने भागले तर आपल्याला दीड मिळेल. भिन्न देशांत अपूर्णांक लिहिण्याच्या पद्धतीही भिन्न आहेत. अपूर्णांकाची आधुनिक पद्धत तयार करण्याचे श्रेयही भारतालाच जाते.

हेही वाचा- समुद्राचे पाणी खारट का असते? पाण्यात एवढं मीठ कुठून येते

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या काळी एक चतुर्थांश, चतुर्थांश, दीड आणि अडीचचे अंश देखील शिकवले जात होते. ज्योतिषशास्त्रात अपूर्णांक संख्या अजूनही वापरली जाते. भारतात, वजन आणि वेळ देखील अपूर्णांकांमध्ये मोजली जाते. हे सुरुवातीपासून भारतीय गणिताचे मूलभूत शब्द आहेत. साडे एक ऐवजी दीड आणि साडे दोन ऐवजी अडीच म्हटल्याने वेळही वाचतो. आता समजा घड्याळात ५.१५ वाजले आहेत, तर तुम्हाला सव्वापाच म्हणणे सोपे जाईल. तसेच, ३.३० वाजले असतील तर साडेतीन म्हणणे सोपे आहे. प्रत्येकासाठी वेळ खूप महत्वाचा आहे, म्हणून हे शब्द फक्त वेळ वाचवण्यासाठी वापरले जातात.