रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेबाबतचे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. रेल्वेचे वेगवेगळे घटक, त्यांचा उपयोग याबाबत प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. अशीच एक नेहमी विचारात पाडणारी गोष्ट म्हणजे रेल्वे रुळाच्या बाजुला असणारे बॉक्स. या बॉक्सचा वापर कशासाठी केला जातो, ठिकठिकाणी हे बॉक्स असण्यामागचे कारण काय असा प्रश्न पडतो. याचे उत्तर अगदी सोपे आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असे बॉक्स रेल्वेरुळाशेजारी बसवण्यात येतात. याचे कार्य काय जाणून घ्या.

रेल्वेरुळाशेजारी असणाऱ्या या बॉक्सना ‘एक्सल काउंटर बॉक्स’ म्हटले जाते. रेल्वे रुळाशेजारी प्रत्येक ३ ते ५ किलोमीटरवर हा बॉक्स बसवण्यात येतो. या बॉक्समध्ये एक स्टोरेज डीवाइस असतो, जो थेट रेल्वेरुळाशी जोडलेला असतो. याद्वारे रेल्वेच्या दोन चाकांना जोडून ठेवणाऱ्या एक्सेलची मोजणी केली जाते.

आणखी वाचा: ट्रेनवर असणाऱ्या या झाकणांचा उपयोग काय असतो? जाणून घ्या याचे महत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक ३ ते ५ किलोमीटरवर असणाऱ्या या बॉक्सद्वारे एक्सेलची मोजणी केली जाते, ज्यामुळे ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघाली तेव्हाच्या डब्ब्यांची संख्या आणि आताच्या डब्ब्यांची संख्या सारखी आहे की नाही याची पडताळणी करता येते. जर एखादी दुर्घटना झाली आणि एखादा डब्बा रेल्वेतून वेगळा झाला तर एक्सल काउंटर बॉक्समुळे ते लगेच समजते. याची माहिती लगेच रेल्वे प्रशासनाला मिळते आणि तिथून पुढील तपास करण्यास मदत मिळते. जर एका एक्सल काउंटर बॉक्समध्ये डब्यांच्या संख्या योग्य नसेल, तर पुढच्या एक्सल काउंटर बॉक्सवर ही माहिती पाठवली जाते आणीबाट्या बॉक्सवरून ट्रेनला लाल सिग्नल दाखवला जातो.