09 March 2021

News Flash

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा C-60 कमांडो पथकावर हल्ला

गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. न

प्रतिनिधीक छायाचित्र

गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पुलसलगोदी परिसरात बेस कॅम्पवर परतणाऱ्या सी ६० कमांडो पथकावर हल्ला केला. यात तीन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आधी आयईडीची स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेचच जवानांवर गोळीबार केला. त्याआधी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी अकराच्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला होता. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

काल एटापल्ली येथील गट्टा भागात निवडणूक पथकाच्या मार्गात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटामध्ये एक जवान जखमी झाला होता. छत्तीसगडमध्ये मतदानाची तयारी करण्यासाठी निघालेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गावर बुधवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला.

यावेळी त्यांच्यासोबत सीआरपीएफच्या १९१ बटालिअनच्या जवानांचे पथक होते. दरम्यान, या स्फोटात एक जवान जखमी झाला आहे.एका सायकलवर आयईडी स्फोटकं लावून नियोजितरित्या हा स्फोट घडवून आला. कालच छत्तीसगडमध्ये भाजपा आमदाराच्या ताफ्याच्या मार्गात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 6:26 pm

Web Title: in gadchiroli naxal attack on c 60 commando force
Next Stories
1 २०६० मध्ये भारत असेल मुस्लिम लोकसंख्येत नंबर १
2 मोदींना देशाच्या प्रश्नांची नाही माझ्या कुटुंबाचीच जास्त काळजी – शरद पवार
3 अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी पडताळणी करा; भारतीय दुतावासाचा विद्यार्थ्यांना सल्ला
Just Now!
X