News Flash

Lok Sabha 2019 : तिसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, २३ एप्रिलला होणार मतदान

रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांनी विविध प्रकारे मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

(संग्रहित छायाचित्र)

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थांबला. त्यानंतर येत्या मंगळवारी, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राज्यात १५ लोकसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये आज प्रचार तोफा थंडावल्या. दरम्यान, रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांनी विविध प्रकारे मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशात ९ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांपैकी राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेनुसार, मतदानापूर्वी ४८ तास आधी प्रचार थांबतो. त्यानुसार, तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला, या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील एकूण १५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मंगळवारी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

रविवारीच प्रचार संपणार असल्याने सुट्टीचा दिवस साधत अनेक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. पदयात्रा, रोडशो त्याचबरोबर देवदर्शन याद्वारे उमेदवारांनी मतदार राजाला आणि देवालाही आपल्याला या लोकसभा २०१९च्या निवडणुकीत चांगले यश मिळू दे यासाठी साकडे घातले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 6:39 pm

Web Title: lok sabha 2019 campaigning for the third phase of polling stopped voting will be 23rd april 2019
Next Stories
1 ५६ पक्ष एकत्र आले तरी ५६ इंच छातीच्या मोदींचा पराभव करू शकणार नाहीत- विनोद तावडे
2 अभिनंदन यांना भारताकडे सोपवले नसते तर ती ‘काळरात्र’ ठरली असती : मोदी
3 देशात भाजपाची सत्ता येईल आणि मोदी पंतप्रधान होतील असं वाटत नाही : ईश्वलाल जैन
Just Now!
X