पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याच्या मुद्यावरुन राजकारण करणाऱ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लातूर औसा येथील सभेत समाचार घेतला. भारताने पााकिस्तानचं एफ-१६ फायटर विमान पाडलं पण पाकिस्तान हे मान्य करायला तयार नाही. काँग्रेसचे लोकही भारताने पाकिस्तानच विमान पाडलं नाही असे म्हणतात. काँग्रेसच्या नेत्यांच्या लष्कर आणि वायू दलाकडून आणखी किती पुरावे हवेत ? असे लोक विरोधात बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असे मोदी म्हणाले.

ज्यांना सरकारवर आपल्या वीर जवानांवर विश्वास नाही त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे. मतपेटी आणि राजकीय स्वार्थासाठी हे लोक देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत. ज्या दिवशी भारताने एअर स्ट्राइक केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने थोडी फडफड करुन दाखवली असे मोदींनी सांगितले.

आम्ही भारताची दोन विमान पाडली असे त्यांचे म्हणणे होते. दोन पायलट आमच्या ताब्यात आहे असे पाकिस्तानचे म्हणणे होते. सकाळी दोन पायलट सांगत होते. संध्याकाळी एकच पायलट ताब्यात आहे हे मान्य केले. एक पायलट अभिनंदन वर्थमान होते तर दुसरा पायलट कोण होता ? हा पाकिस्ताननेच दिलेला पुरावा पुरेसा नाही का ? असा सवाल मोदींनी टीकाकारांना विचारला.