मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी कोणती विकास कामे केली. त्यावर आज झालेल्या सभे दरम्यान बोलतील आम्हाला वाटले होते. मात्र त्यांनी एका व्यक्तिवर टीका करून पंतप्रधानांनी लोकसभेच्या प्रचार सभा कशा असणार आहेत. हे दाखवून दिले आहे. अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना. त्यांना पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मागील पाच वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने केवळ उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेतले आणि सर्व सामान्य नागरिकाला वार्‍यावर सोडण्याचे काम केले आहे. या सरकारने नोटा बंदी आणि gst मुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडला आहे. त्यावर भाजपकडून कोणाही बोलण्यास तयार नाही. किमान आजच्या सभेत देशाच्या सध्य स्थितीवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र पंतप्रधानांनी एक शब्द देखील बोले नाही. त्यामुळे यातून याचा कारभार लक्षात येत असल्याचे टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर जीएसटी मध्ये सुलभता आणू, किचकट प्रक्रिया रद्द करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच राज्यात चार पुरोगामी विचारवंतांची हत्या झाली हे कोणी केली. याचा शोध घेणार नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या न्यायालयाचा निकाल कधी ही येईल. या प्रश्नावर ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा चार्ज मुख्यमंत्रीनी कधी दिला. असा सवाल करीत या भाजपकडून धमकी द्या, दहशत करणे असे प्रकार केले जात आहे. त्यांनी हे सोडून मुद्द्यावर यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

कोकणातील उमेदवाराचे सनातन कनेक्शन च्या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबत मी वरीष्ठ कडे तक्रार नोंदवली असून त्यावर चौकशी करून निर्णय घेतील अशी भूमिका त्यांनी मांडली.

आघाडी कडून अद्यापपर्यंत पुण्याचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, आघाडीचा उमेदवार तीन तारखेला अर्ज दाखल पण नेमका उमेदवार कोण असेल याबाबत चे उत्तर देणे त्यांनी टाळले.