Narendra Modi Swearing-in Live Updates पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याला दिग्गजांची हजेरी आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजल्यापासून  हा सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी थोड्या थोडक्या नाही तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं. यामध्ये बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख  उपस्थित आहेत. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शपथविधासाठी उपस्थित राहिले आहेत.

Live Blog

Highlights

    21:03 (IST)30 May 2019
    देबश्री चौधरी यांनी घेतली शपथ

    देबश्री चौधरी यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ. त्या पश्चिम बंगाल भाजपाच्या सरचिटणीसदेखील आहेत. 2014 मध्ये त्या बर्धमान दुर्गापूर या लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढल्या होत्या.

    21:00 (IST)30 May 2019
    प्रतापचंद्र सारंगी, कैलाश चौधरी यांनी घेतली शपथ

    प्रतापचंद्र सारंगी यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ. ते ओदिशामधून लोकसभेवर आले आहेत. कैलाश चौधरी यांनीही घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ. बाडमेरमधून ते लोकसभेवर निवडून आले आहे. जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांचा त्यांना पराभव केला आहे.

    20:56 (IST)30 May 2019
    रामेश्वर तेली यांनी घेतली शपथ

    रामेश्वर तेली यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ. तेली हे आसामधून निवडून आले आहेत. ते भाजपाचे सक्रीय नेते मानले जातात. 2014 मध्येही ते डिब्रुगडमधून लोकसभेवर निवडून आले होते.

    20:56 (IST)30 May 2019
    सोमप्रकाश यांनी घेतली शपथ

    सोमप्रकाश यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ . सोमप्रकाश हे माजी आयएएस अधिकारी आहेत. तसेच पंजाबच्या होशियारपूरमधून ते निवडून आले आहेत.

    20:53 (IST)30 May 2019
    रेणुका सिंग सरुता यांनी घेतली शपथ

    रेणुका सिंग सरुता यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ. त्या सरगुजामधून निवडून आल्या आहेत.यावेळी त्या खासदार म्हणून तर यापूर्वी राज्यातही त्यांनी मंत्रिपद भूषवले आहे. आदिवासी नेता म्हणून त्यांची ओळत आहे. 

    20:49 (IST)30 May 2019
    व्ही. मुरलीधरन यांनी घेतली शपथ

    व्ही. मुरलीधरन यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ. यापूर्वी ते राज्यसभेचे सदस्य होते. 2018 पासून ते राज्यसभेवर आहेत.

    20:47 (IST)30 May 2019
    रतनलाल कटारिया यांनी घेतली शपथ

    रतनलाल कटारिया यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ. यापूर्वीही ते हरियाणातील अंबालामधून लोकसभेवर निवडून गेले होते. ते भाजपाचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात.

    20:47 (IST)30 May 2019
    नित्यानंद राय यांनी घेतली शपथ

    नित्यानंद राय यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ. 2000 सालापासून ते खासदार म्हणून निवडून जात आहेत.

    20:44 (IST)30 May 2019
    सुरेश अंगडी यांनी घेतली शपथ

    सुरेश अंगडी यांनी  घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ.

    20:41 (IST)30 May 2019
    अनुराग सिंग ठाकूर यांनी घेतली शपथ

    अनुराग सिंग ठाकूर यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. हिमाचल प्रदेशातील हमिरपूरमधून खासदार. सलग चौथ्यांदा ते खासदार म्हणून निवडून गेले आहेत.

    20:38 (IST)30 May 2019
    संजय धोत्रे यांनी घेतली शपथ

    संजय धोत्रे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. सलग चार वेळा ते खासदार होते. तसेच भाजपाचे निष्ठावंत म्हणून ते परिचयाचे आहेत. त्यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पहिल्यांदाच मंत्रीपद त्यांना देण्यात आले आहे.

    20:36 (IST)30 May 2019
    संजिव कुमार बालियान यांनी घेतली शपथ

    डॉ. संजिव कुमार बालियान यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर खासदार. रालोदच्या अजित सिंह यांचा त्यांनी पराभव केला.

    20:34 (IST)30 May 2019
    बाबूल सुप्रियो यांनी घेतली शपथ

    बाबूल सुप्रियो यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. प्रसिद्ध गायक म्हणून प्रसिद्ध. पश्चिम बंगालमधून खासदार. गेल्या मंत्रिमंडळाच अवजड उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी होती. यंदाही महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता.

    20:32 (IST)30 May 2019
    साध्वी निरंजन ज्योती यांनी घेतली शपथ

    साध्वी निरंजन ज्योती यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. गेल्या मंत्रिमंडळात त्यांच्यातडे अन्न पक्रिया उद्योग राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील हमिरपूरमधील आहेत. 2012 साली हमिरपूरमधून आमदारही होत्या.

    20:30 (IST)30 May 2019
    रामदास आठवले यांनी घेतली शपथ

    रामदास आठवले यांची पुन्हा एकदा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. दलित चळवळीतलं एक मोठं नाव म्हणून रामदास आठवले यांची ओळख आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. एनडीएसोबत ते २०१४ मध्येही होते. यावेळीही ते एनडीएसोबत राहिले त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

    20:28 (IST)30 May 2019
    पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

    पुरुषोत्तम रुपाला यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रुपाला हे गुजरातमधून भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. मागच्यावेळीही ते मंत्रिमंडळात कार्यरत होते. यावेळीही त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली आहे 

    20:26 (IST)30 May 2019
    किशन रेड्डी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    भाजपाचे तेलंगणाततले प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते सिकंदराबाद या ठिकाणाहून निवडणूक लढले होते. २००२ मधून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. शपथ घेतल्यानंतर त्यांनी भारतमाता की जय ही घोषणाही दिली. 

    20:19 (IST)30 May 2019
    अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली शपथ

    अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ. यापूर्वी त्यांच्याकडे जलसंपदा, नदी विकास आणि गंगा कायाकल्प आणि संसदीय कामकाज मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

    20:17 (IST)30 May 2019
    अश्विनी कुमार चौबे यांनी घेतली शपथ

    अश्विनी कुमार चौबे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. अश्विनी कुमार चौबे हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि 16 व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

    20:15 (IST)30 May 2019
    मनसुख मांडवीय यांनी मंत्रिपदाची शपथ

    मनसुख मांडवीय यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ. यापूर्वीच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे रस्तेविकास राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. 

    20:13 (IST)30 May 2019
    हरदीपसिंग पुरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

    हरदीपसिंग पुरी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. त्यांच्याकडे यापूर्वी शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. 

    20:10 (IST)30 May 2019
    राज कुमार सिंग यांनी घेतली शपथ

    राज कुमार सिंग यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ. यापूर्वीच्या सरकारमध्येही त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते 1975 च्या बिहार कॅड्रेचे आयएएस अधिकारी आहेत. 

    20:07 (IST)30 May 2019
    प्रल्हादसिंग पटेल यांनी घेतली शपथ

    प्रल्हाद सिंग पटेल यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ.

    20:05 (IST)30 May 2019
    किरण रिजीजू यांनी घेतली शपथ

    किरण रिजीजू यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ. किरण रिजीजू ही भाजपाचे कट्टर नेते मानले जातात. त्यांच्याकडे यापूर्वी गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

    20:03 (IST)30 May 2019
    डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली शपथ

    डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ.

    20:00 (IST)30 May 2019
    श्रीपाद नाईक यांनी घेतली शपथ

    श्रीपाद नाईक यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ. यापूर्वी मोदी सरकारमध्ये ते आयुष मंत्री होते. त्यांना मंत्रालय सांभाळण्याचा अनुभव आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही त्यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आले होते.

    19:59 (IST)30 May 2019
    राव इंद्रजित सिंह यांनी घेतली शपथ

    राव इंद्रजित सिंह यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ

    19:57 (IST)30 May 2019
    गंगवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    संतोष गंगवार यांनी पुन्हा घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ. ते उत्तर प्रदेशमधून 8 वेळा निवडून आले आहेत.

    19:55 (IST)30 May 2019
    गजेंद्रसिंह शेखावत यांनी घेतली शपथ

    गजेंद्रसिंह शेखावत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    19:53 (IST)30 May 2019
    गिरिराज सिंह यांनी घेतली शपथ

    गिरिराज सिंह यांनी पुन्हा घेतली मंत्रिपदाची शपथ.

    19:50 (IST)30 May 2019
    डॉ. अरविंद सावंत यांनी घेतली शपथ

    शिवसेना नेते डॉ. अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

    19:48 (IST)30 May 2019
    डॉ. महेंद्रनाथ पांडेय यांनी घेतली शपथ

    माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडेय यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    19:46 (IST)30 May 2019
    प्रल्हाद जोशी यांनी घेतली शपथ

    कर्नाटकातील भाजपाचे नेते प्रल्हाद जोशी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

    19:44 (IST)30 May 2019
    नक्वी यांनी घेतली शपथ

    मुख्तार अब्बास नक्वी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

    19:42 (IST)30 May 2019
    धर्मेद्र प्रधान यांनी घेतली शपथ

    धर्मेद्र प्रधान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. यापूर्वी सरकारमध्ये त्यांच्याकडे पेट्रोलिअम मंत्री आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

    19:41 (IST)30 May 2019
    पियुष गोयल यांनी घेतली शपथ

    माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. यापूर्वी त्यांच्याकडे रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    19:39 (IST)30 May 2019
    प्रकाश जावडेकर यांनी घेतली शपथ

    प्रकाश जावडेकर यांनी पुन्हा घेतली मंत्रिपदाची शपथ. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात  त्यांच्याकडे पर्यावरण मंत्री, संसदीय कामकाजाचे राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्य (स्वतंत्र प्रभार) मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली  होती. त्यानंतर त्यांच्याकडे केद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. 2008 पासून जवाडेकर राज्यसभा खासदार आहेत.

    Dr. Harsh Vardhan, Prakash Javadekar and Piyush Goyal take oath as Union Ministers. #ModiSwearingIn pic.twitter.com/X0u9zzhlFF— ANI (@ANI) May 30, 2019

    19:37 (IST)30 May 2019
    डॉ. हर्ष वर्धन यांनी घेतली शपथ

    डॉ. हर्ष वर्धन यांनी पुन्हा घेतली मंत्रिपदाची शपथ. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांनी चांदनी चौकवरून दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाच्या आशुतोष यांचा पराभव केला होता.

    19:35 (IST)30 May 2019
    स्मृती इराणी यांनी घेतली शपथ

    भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. त्यांनी राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला होता. यापूर्वीही त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले होते.

    Smriti Irani takes oath as Union Minister. #ModiSwearingIn pic.twitter.com/Js8PuW5ipg— ANI (@ANI) May 30, 2019

    19:32 (IST)30 May 2019
    अर्जुन मुंडा यांनी घेतली शपथ

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Pm narendra modi swearing in oath ceremony in rashtrapati bhawan live updates
    First published on: 30-05-2019 at 15:58 IST