भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरताना गांधीनगरला गेलो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्ज भरताना वाराणसीमध्ये गेलो. महायुतीचे नेते एकत्र दिसतात. मग शरद पवार आणि राहुल गांधी का नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला.

शरद पवार आणि राहुल गांधी यांची एकत्रित सभा पाहिली नाही. जे मनाने एकत्र येत नाही, ते सरकार बनवण्यासाठी एकत्र येणार असे वाटते का? असा सवाल त्यांनी केला. पाकिस्तानमध्ये कारवाई करणार नुसत बोललो नाही. घुसून मारुन दाखवलं.

वंदे मातरम देशाला देणाऱ्या बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बांगलादेशी कलाकार बोलवावे लागतात त्यावरुन त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. भगवा हा विचार आहे. समविचारी पक्ष म्हणून एकत्र आलो आहेत. आमच्याकडे विरोधकांसारखा मिनिमम नाही. मॅक्सिमम प्रोग्रॅम आहे. देशाचा विकास करणार. अयोध्येत राम मंदिर बांधणार. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.