राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोखठोक स्वभाव हा सगळ्या महाराष्ट्रालाच माहीत आहे. तसंच त्यांच्या राजकारणाची चर्चाही होत असते. अजित पवार नॉट रिचेबल झाले की त्याचीही चर्चा घडते. मागच्या दोन दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला तेव्हाही अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. अशात शरद पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी अजित पवारांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार नॉट रिचेबल होणं नवं नाही

अजित पवार नॉट रिचेबल होणं हे काही नवं नाही. याआधीही अजित पवार नॉट रिचेबल झाले आहेत. अजित पवारांची प्रकृती बरी नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलं गेलं आहे. मात्र तरीही त्यांच्या अशा नॉट रिचेबल असण्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्यावर बारामतीच्या मतदानाच्या आधी दमदाटी केल्याचा आणि पैसे वाटप केल्याचा आरोपही शरद पवार गटाने केला होता. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात उभा दावा तयार झाला आहे. कारण २०२३ मध्ये अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंड करत दंड थोपटले आणि सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. आता शरद पवार यांना याविषयी विचारलं असता त्यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

हे पण वाचा- बारामतीतील मतदानानंतर अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याचा आरोप; राष्ट्रवादी काँग्रेसने दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?

“अजित पवारांची प्रकृती खरोखरच बरी नाही.” असं एका वाक्यात उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. शरद पवार यांच्या विरोधात अजित पवारांनी भूमिका घेतली असली तरीही शरद पवार हे त्यांचे काका आहेत. शरद पवारांनी त्यांची प्रकृती बरी नसल्याचं उत्तर दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार १७ मे च्या सभेत दिसणार का?

अजित पवार हे १७ मेच्या सभेत दिसणार का? याची चर्चा होते आहे. मात्र अजित पवार यांची नॉट रिचेबल होण्याची स्टाईल आहे. २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंड केलं. त्यानंतर ते महायुतीत सहभागी झाले आहेत. ४० पेक्षा जास्त आमदारांना बरोबर घेत त्यांनी महायुतीत सहभागी होणं पसंत केलं आहे. आता सध्या ते नॉट रिचेबल असण्याची चर्चा सुरु झाली आहे. महायुतीच्या १७ मेच्या सभेत ते असतील का या चर्चा सुरु झाल्या आहेत.