Amol Kolhe : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार? हा सस्पेन्स आता संपला आहे. कारण निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला म्हणजेच मतदानानंतर तीन दिवसांनी निवडणूक निकाल जाहीर होतील. झारखंड आणि महाराष्ट्र यांचे निकाल एकाच दिवशी जाहीर होणार आहेत. या निवडणूक निकालांमध्ये काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. खासदार अमोल कोल्हेंची ( Amol Kolhe ) पोस्ट या निमित्ताने चर्चेत आली आहे.
महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?
महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
निवडणूक आणि निकाल दोन्हीची तारीख जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतल २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे. या घोषणेनंतर खासदार अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) एक पोस्ट केली आहे ज्या पोस्टची चर्चा होते आहे.
काय आहे अमोल कोल्हेंची पोस्ट?
महाराष्ट्राचं ठरलंय…
२० नोव्हेंबर – गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम करायचा..
२३ नोव्हेंबर – स्वाभिमानाचा गुलाल उधळायचा..!
ही पोस्ट अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) केली आहे. महाराष्ट्रात जी लोकसभा निवडणूक पार पडली त्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ जागांवर यश मिळवलं तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत प्रचंड वाढलेला आहे हे दिसून येतं आहे. तर महायुतीनेही कंबर कसली आहे. भाजपाने हरियाणाची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाही नव्या जोमाने मैदानात उतरल्याचं दिसतं आहे. आता अमोल कोल्हे म्हणतात तसा करेक्ट कार्यक्रम होईल पण तो कुणाचा? हे महाराष्ट्र ठरवणार आहे हे नक्की.