देशात सध्या पाच राज्यांमधील निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे. त्यामध्ये राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा देखील समावेश आहे. या निवडणुका ७ टप्प्यांमध्ये होणार असून १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी देखील अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवार मात्र प्रचारामुळे वेळेत अर्ज भरण्यासाठी पोहोचू शकले नाहीत आणि त्यांना ऐनवेळी पळत निवडणूक कार्यालय गाठावं लागलं. त्यातलेच एक म्हणजे उत्तर प्रदेशचे विद्यमान क्रीडा राज्यमंत्री उपेंद्र तिवारी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपेंद्र तिवारींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एएनआयनं देखील त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये उपेंद्र तिवारी चक्क धावत पळतच निवडणूक अर्ज नोंदणीसाठी जाताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एवढी धावपळ केल्यानंतर निश्चित वेळेच्या अवघ्या तीन मिनिटं आधी उपेंद्र तिवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले!

उपेंद्र तिवारींनी उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील फेफना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारी रोजी मतदान होईल. ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी असेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate in uttar pradesh election runs to file nomination form video viral pmw
First published on: 05-02-2022 at 17:42 IST