लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट होत आले आहेत. काही ठिकाणी मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्या सुरू आहेत. देशात इंडिया आघाडी २२९ जागांवर आघाडीवर आहे. एनडीए २९६ जागांवर आघाडीवर आहे. काही वेळात जवळपास सर्व निकालाचे चित्र स्पष्ट होतील. केरळमधील इडुक्की मतदारसंघातून काँग्रेसचे डीन कुरियाकोस यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला आहे.

इडुक्की मतदारसंघाच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. डीन कुरियाकोस यांना तब्बल ४ लाख ३२ हजार ३७२ मते मिळाली आहेत. डीन कुरियाकोस यांच्या विरोधात इडुक्की मतदारसंघातून सीपीआय एम पक्षाचे जॉयस जॉर्ज होते. त्यांना २ लाख ९८ हजार मते पडली आहेत.

हेही वाचा : आंध्र प्रदेशात टीडीपी अन् भाजपाला बहुमत, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी दिला राजीनामा

लोकसभेची निवडणूक लढवलेल्या काही उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खूनाचा प्रयत्न, फौजदारी गुन्हे यासह आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. यापैकी एक केरळमधील इडुक्की मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डीन कुरियाकोस यांचाही सहभाग आहे. त्यांच्यावर ८८ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २३ गंभीर गुन्हे असल्याची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीन कुरियाकोस कोण आहेत?

डीन कुरियाकोस हे केरळमधील काँग्रेसचे नेते आहेत. ते युवक काँग्रेसच्या केरळचे अध्यक्ष राहिलेले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इडुक्की लोकसभा मतदारसंघातून १ लाख ७१ हजार मतांच्या फरकाने ते विजयी झाले होते. यानंतर आता २०१४ ला त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण २.१ कोटींची संपत्ती आहे. दरम्यान, डीन कुरियाकोस हे युवक काँग्रेसच्या केरळचे अध्यक्ष राहिलेले आहेत.