कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मजमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने आतापर्यंत (७ वाजेपर्यंत) २१४ जागांवरील निकाल घोषित केला आहे. यामध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलं असून काँग्रेसला भाजपापेक्षा जवळपास दुप्पट जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस १३१ जागांवर विजय संपादन केला असून अन्य पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दुसरीकडे, भाजपाने या निवडणुकीत ६० जागा जिंकल्या आहेत. तर अन्य पाच जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. सध्या राजकीय स्थितीत कर्नाटकमधील काँग्रेसचा हा विजय प्रचंड मोठा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक मोठे नेते कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत होते. तरीही कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसच्या बाजुने बहुमताने कौल दिला आहे.

हेही वाचा- “हुकूमशाहीचा पराभव होण्याची…”, कर्नाटक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात कोणत्या वर्षी आणि कोणत्या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तसेच कोणत्या पक्षाने विक्रम केले होते, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊयात…

हेही वाचा- “भाजपाने ऑपरेशन ‘लोटस’साठी भरपूर पैसा खर्च केला”, काँग्रेस नेते सिद्धरामय्यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या चारही क्रमांवर काँग्रेस…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे. सर्वाधिक जागा जिंकण्याच्या यादीत पहिल्या चार क्रमांकापर्यंत काँग्रेस पक्षाचा दबदबा आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, १९८९ साली काँग्रेसने सर्वाधिक १७८ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर, १९७२ साली काँग्रेसने १६५ जागा जिंकत विजय संपादन केला होता. तर १९५७ साली काँग्रेसने १५० जागा जिंकल्या होत्या. १९७८ साली काँग्रेसने १४९ जागांवर विजय संपादन केला होता.