निवडणूक आली की रोख रक्कम सापडणं ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. मात्र निवडणूक आयोगाने आत्तापर्यंतची सर्वात मोठी रक्कम ताब्यात घेतली आहे. ही रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल १०० कोटींची आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. रोज सरासरी १०० कोटी रुपये जप्त करण्यात येत आहेत असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. १ मार्च ते १५ एप्रिलल या कालावधीत जप्त केलेली रक्कम ४ हजार ६५० कोटी रुपये इतकी आहे.

काय आहे निवडणूक आयोगाची पोस्ट?

निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत म्हणजेच १ मार्च ते १५ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत दिवसाला सरासरी १०० कोटी रुपये जप्त केले आहेत. आत्तापर्यंत या रोख रक्कमेचा डोंगर ४६५० कोटी इतका झाला आहे. जप्त होणाऱ्या रोख रक्कमेपैकी ही सर्वाधिक रक्कम आहे. तसंच २०१९ च्या तुलनेतही ही रक्कम सर्वाधिक आहे. असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

Sharad pawar on Udyanraje bhosale lok sabha election
“राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला
NARENDRA MODI
‘पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढविण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; कारण काय?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताना काय म्हटलं होतं?

निवडणुकीत मनी आणि मसल पॉवर रोखण्याचं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मात्र या आव्हानाला आपण समर्थपणे तोंड देत आहोत असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. मनी आणि मसल पावरचा वापर कुणी केल्यास आम्ही कठोर कारवाई करु. प्रचाराच्या दरम्यान साड्या, मद्य, भेटवस्तू यांचं वाटप केल्यास कारवाई केली जाणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अशा कुठल्याही व्यवहाराला थारा दिला जाणार नाही. ही माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे खोट्या बातम्यांमागची सत्यताही आम्ही तपासणार आहोत. त्यासाठी वेबसाईट तयार केली जाईल असंही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीची बहुप्रतीक्षित घोषणा निवडणूक आयोगाने अखेर शनिवारी केली. ९७.६ कोटी नोंदणीकृत मतदार १९ एप्रिल ते १ जून अशा ४४ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये १९ एप्रिल ते २० मे या कालावधीत ५ टप्प्यांमध्ये मतदान होईल. ४ जून रोजी मतमोजणी होईल.

महाराष्ट्र : पाच टप्प्यांत मतदान

  • टप्पा १ : १९ एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
  • टप्पा २ : २६ एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, िहगोली, नांदेड, परभणी.
  • टप्पा ३ : ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
  • टप्पा ४ : १३ मे : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर,
  • टप्पा ५ : २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सर्वच्या सर्व सहा मतदारसंघ.