शिवसेना पक्ष ठाण्यासह आसपासच्या भागात वाढवणारे नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आनंद दिघे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व नेत्यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. दिघे यांचे खास शिष्य अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या भूमिकादेखील या चित्रपटात होत्या. या चित्रपटाचा आता दुसऱा भाग प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत आणि राजन विचारे यांच्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चित्रपटामध्ये राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व काही खोटं होतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघे यांनी सांगूनही राजन विचारे यांनी तेव्हा सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला नव्हता. राजन विचारे हे आनंद दिघे यांचे नकली शिष्य आहेत. धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाद्वारे आम्ही त्यांचं खरं रूप सर्वांसमोर आणू.

एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर चित्रपटांमध्ये असं दाखवलंय की आनंद दिघे राजन विचारेंना सांगतात की सभागृह नेतेपदाचा राजीनामा दे आणि त्यानंतर ते राजीनामा देतात. मग मी सभागृह नेता होतो. मात्र ते सगळं खोटं आहे. त्यावेळी खरं काय घडलं होतं ते आम्ही धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दाखवणार आहोत. खरंतर आनंद दिघे यांनी राजन विचारे यांना राजीनामा द्यायला सांगितलं होता. मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही. ते राजीनामा द्यायला टाळाटाळ करत होते. त्यांनंतर ते राजीनामा टेबलवर ठेवून गेले. रघुनाथ मोरेंना त्याची कल्पना दिली. तत्पूर्वी ‘हे काय चाललंय?’, ‘माझं पद का काढून घेत आहात?’ असे प्रश्न त्यांनी विचारले. मात्र रघुनाथ मोरे हुशार होते. त्यांनी राजन विचारेंना सांगितलं की आनंद दिघे यांनी हा निर्णय खूप जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक घेतला आहे. हा निर्णय एका विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तू याबाबत इकडे तिकडे काही बोलू नको. कुठेही वाच्यता करू नको.

Eknath shinde and nitish kumar
“४०० पारच्या घोषणेमुळे गडबड झाली”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर जदयू नेते म्हणाले, “निवडणुकीत…”
Narendra Modi
“थंड चहा दिला म्हणून कानाखाली मारायचे, लहानपणापासूनच अपमान-शिवीगाळ नशिबात…”, मोदींनी सांगितली करुण कहाणी
MP Swati Maliwal
अरविंद केजरीवालांना अटक झाली तेव्हा स्वाती मालिवाल अमेरिकेत का होत्या? खुलासा करत म्हणाल्या “आप कार्यकर्त्यांनी…”
pm Narendra modi parmatma ka dut marathi news
प्रधानसेवक, चौकीदार आणि आता परमात्मा का दूत…
malati joshi
व्यक्तिवेध: मालती जोशी
Arvind Kejriwal,
स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवालांच्या आई-वडिलांची चौकशी होणार? दिल्ली पोलीस म्हणाले…
hasan mushrif on pn patil
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या राजकारणाला धक्का; नेत्यांनी व्यक्त केल्या भावना
Shishir Shinde demand for expulsion of Gajanan Kirtikar
मतदानानंतर महायुतीत धुसफूस; गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची शिशिर शिंदे यांची मागणी, भाजपचीही टीका

हे ही वाचा >> गुजरातीबहुल सोसायटीत मराठी माणसाला नो एंट्री! गिरगावपाठोपाठ घाटकोपरमधील घटनेचा ठाकरे गटाकडून तीव्र निषेध

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रघनुाथ मोरे यांनी समजावून देखील राजन विचारे ऐकले नाहीत. उलट ते आनंद दिघे यांना नको नको ते बोलले. मनात होतं ते सगळं काही बोलले. मला काही ते पद नको होतं. त्यामुळे मी आनंद दिघे यांना सांगितलं की, तुम्ही असं करू नका. त्यानंतर आनंद दिघे यांनी राजन विचारे यांना आनंद आश्रममध्ये बोलावलं. आनंद आश्रममधील आतल्या खोलीत नेलं आणि त्यांच्या भाषेत सांगितलं. धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागत तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल. आम्ही धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंची खूप चांगली प्रतिमा दाखवली होती. मात्र ते तसे नाहीत. ते बिलकूल चांगले नाहीत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात तुम्हाला त्यांचा खरा चेहरा पाहायला मिळेल.