मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रांतील नामवंतांची मदत घेण्यात येणार आहे. त्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेते प्रशांत दामले, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना आदी १६ मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल

राज्यात विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरी भागांतील मतदानाची घटती टक्केवारी ही निवडणूक आयोगासाठी चिंतेची बाब आहे. यंदाही मतदान कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार मतदार जनजागृतीसाठी आयोगाने विविध क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

कोणाचा समावेश?

* अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

* साहित्यिक मधु मंगेश कर्णिक

* अभिनेते प्रशांत दामले

* अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

* अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड

* अभिनेत्री उषा जाधव

* अभिनेत्री सान्वी जेठवानी

* क्रिकेटपटू स्मृती मनधना

* सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत

* अर्जुन पुरस्कार सन्मानित धावपटू ललिता बाबर

* अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे

* तृतीयपंथी कार्यकर्त्यां गौरी सावंत

* तृतीयपंथी कार्यकर्ता प्रणीत हाटे

* तृतीयपंथी कार्यकर्ता झैनाब पटेल

* अपंग कार्यकर्ता नीलेश सिंगीत

* अपंग कार्यकर्ती सोनल नवनगुल