अभिनेत्री कंगना रणौतने आज कुलू या ठिकाणी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत कंगनाने विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. लोकसभा निवडणूक १९ एप्रिलपासून सुरु होती आहे. कंगना रणौतला भाजपाने हिमाचलच्या मंडीमधून तिकिट दिलं आहे. त्यानंतर कंगनाने भाजपाचा जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. कंगना रणौतने आज मी माझं अस्तित्व विसरले आहे भाजपा हेच माझं अस्तित्व आहे असं म्हटलं आहे. तसंच नरेंद्र मोदींमध्ये रामाचा अंश असल्याचाही पुनरुच्चार केला आहे.

काय म्हणाली कंगना रणौत?

“२०१४ मध्ये आपल्या सगळ्यांना चेतना फुलवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. हिंदू राष्ट्र आणि सनातन यांची चेतना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागृत केली. अधर्माच्या विरोधात धर्माची लढा सुरु झाला. ही चेतना आता सगळ्या देशभरात पसरली आहे. आम्ही सगळे श्रीरामाचे सेवक आहोत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामाचा अंश आहेत. रामाच्या फक्त मूर्तीची पूजा होत नाही. रामाच्या चरित्राची पूजा करणारा आपला देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये प्रभू रामाचा संयम, प्रभू रामाचा दयाभाव हे सगळं आहे. माझा त्यांच्या सेनेत खारीचा वाटा आहे. ” असं कंगनाने म्हटलं आहे.

आपण सगळे रामाची सेना आहोत

कंगना पुढे म्हणाली, आपण सगळे रामाची सेना आहोत. कुणाचाही मदत या पक्षासाठी कमी नाही. तुम्ही किंवा मी आपलं वेगळं अस्तित्व नाही आता आपण सगळेच नरेंद्र मोदी आहोत. आपण सगळे सगळे चेतनेचा अंश आहोत. भारताचा विकास नरेंद्र मोदी करत आहेत आपण सगळे त्यांना साथ देत आहोत. मी पक्षात प्रवेश केला मी माझं अस्तित्व विसरले आहे. मी माझं अस्तित्व विसरले आहे. मी अभिनेत्री होते हेदेखील मी विसरले आहे. माझं एकच अस्तित्व आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे असंही कंगनाने म्हटलं आहे. मी म्हणजे तुमच्या सगळ्यांमधलीच एक आहे. आपल्यात कुठलीही असमानता नाही असंही कंगनाने म्हटलं आहे. आपल्या समोर मोठी लढाई आहे. ही लढाई म्हणजे लोकसभा निवडणूक. काँग्रेसचा समूहाने उमेदवारही दिलेला नाही पण त्यांचं कपट-कारस्थान सुरु झालं आहे त्यापासून सावध राहा असंही कंगनाने म्हटलं आहे.

हे पण वाचा- कंगना रणौतचं राहुल गांधींना आव्हान, “…तर राजकारणच काय, मी हा देश सोडून निघून जाईन”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस सरकारने हिमाचलमध्ये दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही

काँग्रेसच्या सरकारने हे म्हटलं होतं की पेन्शन स्कीम सुरु करणार. त्यांनी सुरु केली का? मोबाइल हॉस्पिटल बनवणार सांगितलं होतं ते केलं? कुणी पाहिलं का? मंडीमध्ये अशी हॉस्पिटल सुरु झाली आहेत का? ५ ते ६ लाख नोकऱ्या देणार त्या कुणाला नोकऱ्या मिळाल्या का? जी आश्वासनं दिली त्यातलं एकही आश्वासन हिमाचलमध्ये काँग्रेसने पूर्ण केलं नाही. डंके की चोटपर कुणी काम करत असेल तर एकच व्यक्ती आहे ते म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. तू इथर उधर की बात मत कर ये बता की काफिला क्यूँ लुटा. असंही कंगनाने म्हटलं आहे.