karnataka Nivadnuk 2023 : कर्नाटकात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. यादरम्यान काँग्रेसने भाजपावर मोठा आरोप केला आहे. गोव्यातील काही बस उत्तर कर्नाटकात आल्या असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय. या बसेस येथे काय करताहेत? या बसमधून पैसे आणले जातायत का? की बोगस मतदानाची तयारी सुरू आहे, असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहे.

काँग्रेस नेता पवन खेरा यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “गोव्यातील लोकांना कादांबा ट्रान्स्पोर्टेशनच्या बसमधून उत्तर कर्नाटकात का पाठवत आहे? गेल्या आठवड्यातही मोदींच्या रॅलीकरता १०० हून अधिक बसमधून कर्नाटकात आणण्यात आलं होतं.”

हेही वाचा >> Video: “कृपया आमच्याकडे पाहा, आम्ही वृद्ध आहोत, पण तरी…”, सुधा मूर्तींनी पिळले तरुणांचे कान!

काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “हा गंभीर गुन्हा आहे. यातून अवैध पैसे आणले जात आहेत का? कर्नाटक पोलीस काय करतंय? डांडेलीच्या विसलिंग वुड्ज जंगल रिसोर्टमध्ये काय होतंय? विश्वजीत राणे यांनी येथे सहा खोल्या बुक केल्या आहेत का? त्याचा उद्देश नेमका काय आहे? याप्रकरणी निवडणूक आयोग कारवाई करेल का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. निवडणूक प्रचारावेळी भाजपा आणि काँग्रेस यांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले आहेत.भाजपाने सोनिया गांधी यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार केली आहे, तर, काँग्रेसनेही मोदींविरोधात तक्रार केली आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमने सामने आले होते. यामुळे आज मतदान झाल्यानंतर १३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा >> “मणिपूर पेटलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले, “बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकात किती मतदार?

कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे. या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील.