मणिपूरमध्ये आदिवासी आणि मैतइ सुमदायामध्ये हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारामुळे दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे सरकारने दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी ( ६ मे ) पाच जणांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे तेथील दंगलबळींची संख्या ५४ वर पोहोचली आहे. यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

“मणिपूर जळत आहे. पण, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह कर्नाटकात विधानसभेच्या प्रचारात दंग आहेत. भाजपाच्या हिंसा आणि द्वेषाच्या राजकारणामुळे मणिपूरमध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे,” अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. ते कर्नाटकात प्रचारसभेत बोलत होते.

हेही वाचा : VIDEO : कर्नाटकात राहुल गांधींचा हटके अंदाज, डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका

“भाजपा जिथे जाते, तिथे दुही निर्माण करून द्वेष पसरवण्याचं काम करते. त्यांचं काम द्वेष पसरवण्याचं असून, आमचं काम लोकांना जोडण्याचं आहे,” असेही राहुल गांधींनी म्हटलं.

“जेवढा द्वेष त्यांच्या मनात आहे. त्याच्या १० पटीने अधिक प्रेम आमच्या मनात आहे. द्वेषाला द्वेषाने हरवलं जाऊ शकत नाही. तर, द्वेषाला प्रेमाने हरवलं जाऊ शकते,” असेही राहुल गांधींनी सांगितलं.

हेही वाचा : “कर्नाटकमध्ये बहुमताने भाजपचा विजय होणार”- चंद्रशेखर बावनकुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

मणिपूर उच्च न्यायालयाने मैतेइ समाजातील लोकांना अनुसूचित जमातीमध्ये स्थान देण्याबाबत ४ आठवड्यात विचार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. केंद्र सरकारलाही याबद्दल विचार करण्यासाठी शिफारस करण्याच आदेश न्यायालयाने राज्य सरकारल दिले होते. यालाच विरोध करण्यासाठी बुधवारी ( ३ मे ) ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने चुराचांदपूर जिह्याच्या तोरबंगमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं. ‘आदिवासी एकता मार्च’ नावानं असलेल्या या रॅली हजारो संख्येने लोक सहभागी झाले होते. तेव्हाच हिंसाचार सुरु झाल्याचं सांगितलं जात आहे.