भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत १११ नावं आहेत. पिलभीत या ठिकाणाहून वरुण गांधींचं तिकिट कापण्यात आलं आहे. तर कंगना रणौत, अरुण गोविल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. या सगळ्या नावांमध्ये एक नाव आणखी चर्चेत आहे ते म्हणजे नवीन जिंदाल. नवीन जिंदाल काँग्रेसमधून भाजपात आल्याची घोषणा झाली. त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांचं नाव या यादीत झळकलं.

अर्ध्या तासात लोकसभेचं तिकिट

भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात विनोद तावडे यांनी नवीन जिंदाल भाजपात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अर्ध्या तासात जी यादी आली त्यात नवीन जिंदाल हे नाव होतं. हरयाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून नवीन जिंदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवीन जिंदाल यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा रविवारीच दिला. त्यानंतर काही तासात त्यांचा भाजपात प्रवेश झाला. भाजपात प्रवेश केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांचं नाव उमेदवारांच्या यादीत झळकलं.

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
BJP test, Congress, West Nagpur,
काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

नवीन जिंदाल यांचा अल्पपरिचय

नवीन जिंदाल हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. तसंच देशातल्या मोठ्या उद्योजकांपैकी नवीन जिंदाल एक आहेत. त्याचप्रमाणे ते उत्तम खेळाडू आहेत. तिरंगा ध्वज फडकवण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे हा हक्क मिळवून देणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. नवीन जिंदल हे वरिष्ठ काँग्रेस नेते ओ. पी. जिंदाल यांचे पुत्र आहेत. हरयाणा सरकारमध्ये त्यांनी उर्जा मंत्री म्हणूनही काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाचं स्वप्न दाखवलं आहे. त्यामध्ये माझाही खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून भाजपात आलो आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असंही नवीन जिंदाल यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी म्हटलं होतं.

हे ही वाचा- ‘रामायण’ मालिकेतले प्रभू श्रीरामही निवडणुकीच्या मैदानात, अरुण गोविल यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी

भाजपाची पाचवी यादी जाहीर

भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातली आणखी तीन नावं आहे. महायुतीचा जागा वाटपाचा पेच वाढत असताना आणि त्यात मनसेही येईल का? या सगळ्या चर्चा सुरु असताना महाराष्ट्रात भाजपाने तीन नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २० जणांची यादी भाजपाने आधीच जाहीर केली आहे. आता भाजपाने आणखी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना मिळणाऱ्या जागा या बाकी २५ जागांमधून असतील यात शंका नाही. तर भाजपाने या निवडणुकीतून वरुण गांधींचा पत्ता कापला आहे.