Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी नऊ ठिकाणी उमेदवार दिल्याची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडली होती. विशेषत: सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राष्ट्रवादीचे इतर उमेदवार नेमके कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, याची यादी राष्ट्रवादीच्या कामगिरीचं मूल्यमापन करताना महत्त्वाची ठरणार आहे. बेळगाव, विजापूर, विजयनगर, कोप्पल, कोडोगो, मैसूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार उभे केले होते.

१. निपाणी (बेळगाव) – उत्तमराव पाटील

२. जेवर हिप्पारगी (विजापूर) – मन्सूर साहेब बिलाही

३. बसवन बागेवाडी (विजापूर) – जमीर अहमद इनामदार

४. नागथन (विजापूर) – कुलप्पा चव्हाण

५. येलबर्गा (कोप्पल) – हरी आर

६. रानबेन्नूर (हवेरी) – आर. शंकर

७. हाग्री बोम्मनहल्ली (विजयनगर) – सुगुना के

८. विराजपेट (कोडोगो) – एस. वाय. एम. मसूद फौजदार

९. नरसिंहराज (मैसूर) – रेहाना बानो

 “‘या’ एका घोषणेने कर्नाटकात भाजपाचा पराभव”, सचिन पायलट यांनी सांगितलं काँग्रेसच्या विजयाचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या हातून कर्नाटक निसटलं!

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसनं बहुमताच्या दिशेनं आगेकूच केली असून एक्झिट पोलपेक्षाची उजवी कामगिरी पक्षानं राज्यात करून दाखवली आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारानंतरही राज्यातील मतदारांनी भाजपाच्या राजकारणाला नाकारल्याचं पाहायला मिळत आहे.