Telangana Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 202: पाच राज्यांपैकी चार राज्यांची मतमोजणी आज पार पडली असून मिझोरमची मतमोजणी सोमवारी होणार आहे. आज मतमोजणी झालेल्या चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसला चारीमुंड्या चीत केलं. तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसनं एग्झिट पोल्सच्या अंदाजानुसार जोरदार मुसंडी मारत मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला सत्तेतून खाली खेचलं. काँग्रेसच्या या विजयाचं श्रेय तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांना दिलं आहे. यासंदर्भात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेली खोचक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं तेलंगणामध्ये?

एकीकडे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला नामुष्कीजनक कामगिरीचा सामना करावा लागला असताना तेलंगणामध्ये मात्र काँग्रेससाठी दिलासादायक निकाल लागले आहेत. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं १० वर्षांची केसीआर यांची सत्ता उलथवून टाकली. हा केसीआर यांना मोठा धक्का मानला जात आहे. तेलंगणाचे आगामी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेच होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर रेवंत रेड्डी यांच्या विजयावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “२३ नोव्हेंबरला राज्यात बॉम्ब फुटणार”, मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीला इशारा
division of votes in vidarbha constituencies
विदर्भात मतविभाजनासाठी ‘उदंड झाले अपक्ष’; ‘हरियाणा पॅटर्न’ची चर्चा
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024,
निवडणुकीच्या मैदानात तिरंगी-चौरंगी लढतीची रंगत; अकोला वाशीम जिल्ह्यातील आठही मतदारसंघात चुरस
Gopal Krishna Gokhale, Haribhau Apte,
मतदारांना ‘किंमत’ देणारे लोकप्रतिनिधी

रामगोपाल वर्मा यांची पोस्ट व्हायरल

दरम्यान, काँग्रेसचा तेलंगणामधला विजय हा खऱ्या अर्थाने रेवंत रेड्डी यांचाच विजय असल्याचं राम गोपाल वर्मा यांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “काँग्रेस इतर सर्व राज्यांमध्ये पराभूत झाली आहे. त्यामुळे तेलंगणामधला विजय हा काँग्रेसचा विजय नसून रेवंत रेड्डी यांचा विजय आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी त्यांच्या ग्रह-ताऱ्यांचे आभार मानायला हवेत. त्यांना रेवंत रेड्डी यांच्यात एक बाहुबली मिळाला आहे”, असं राम गोपाल वर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोण आहेत रेवंत रेड्डी?

५४ वर्षीय रेवंत रेड्डी यांनी खरंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अभाविपपासून सुरुवात केली. २००६ साली जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून त्यांनी आपल्यातल्या नेतृत्वगुणांची ओळख करून दिली. पुढच्याच वर्षी त्यांना आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून जाण्याची संधी मिळाली. पुढे २००९ साली टीडीपीच्या तिकिटावर विधानसभा लढवताना त्यांनी काँग्रेसच्या मातब्बर गुरुनाथ रेड्डींचा पराभव केला. २०१४चीही विधानसभा निवडणूक ते जिंकले. मात्र, अंतर्गत मतभेदांमुळे चंद्राबाबू नायडूंनी त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली. काहीच दिवसांत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Revanth Reddy : अभाविप, टीडीपी ते काँग्रेस; कधी काळी तुरुंगात गेलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार?

२०१९ साली ते काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. २०२१ साली त्यांच्यावर पक्षानं तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. २०१५ साली कॅश फॉर व्होट प्रकरणात रेवंत रेड्डी यांना अटकही झाली होती.