उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीचा दौरा केला. सांगलीत संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या दोघांची कॅमेरासमोर जी एक चर्चा झाली त्यावरुन आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस सांगलीच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगलीतल्या कवलपूर येथील विमानतळावर दाखल झाले. तिथल्या भाजपा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत केलं. त्याचवेळी कवलपूर विमानतळावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे अर्थात भिडेगुरुजीही उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरले आणि संभाजी भिडेंना पाहिलं त्यानंतर त्यांनी लगेचच संभाजी भिडेंची भेट घेतली.

भिडे गुरुजींनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काय सांगितलं?

संभाजी भिडेंना भेटण्यासाठी जेव्हा देवेंद्र फडणवीस पुढे आले तेव्हा त्यांनी संभाजी भिडेंच्या कानात काहीतरी सांगितलं. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी होकारार्थी मान डोलवली. या कृतीची चर्चा सांगलीत चांगलीच रंगली आहे. संभाजी भिडेंनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात नेमकं काय सांगितलं हे समोर आलेलं नाही. मात्र राजकीय वर्तुळात भिडे गुरुजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काय बोलले? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे पण वाचा- आहे ‘मनोहर’ तरीही..!, संभाजी भिडेंची आत्तापर्यंतची वादग्रस्त वक्तव्यं काय काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

संजय काका पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आमच्याकडेही पैलवान आहेत. आपली विकासाची गाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. विरोधकांच्या गाडीला मात्र इंजिनच नाही. लालूप्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे. कुणाचं नीट काही ठरत नाही. संजयकाकांना तिसऱ्यांदा निवडून आणायचं आहे. कारण संजयकाका पाटील सांगलीकरांना विकासाकडे घेऊन जात आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.