आजचा दिवस हा निवडणुकीसाठी उमेदवाराचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. अर्ज भरायलाच लोक इतक्या उत्साहाने आले आहेत तर मतदारसंघात किती जोमाने काम करणार हे तुमच्या उपस्थितीने सगळ्यांना झालं असं शरद पवार म्हणाले आहेत. अनेकदा तुमच्याशी संपर्क साधायची संधी येत्या काही दिवसांत आम्हाला मिळणार आहे. असंही शरद पवार म्हणाले आहे.

राज्यकर्त्यांनी मागची दहा वर्षे जनतेची फसवणूक केली

“आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. महिलांवरचे अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी या सगळ्यांबाबत दिलेली आश्वासनं आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आले. त्याआधी मनमोहन सिंग यांनी सत्ता सोडली. त्यावेळी पेट्रोलचे दर ७१ रुपये लिटर होते. मोदींनी आश्वासन दिलं होतं ५० दिवसांत पेट्रोलचे किंमती ५० टक्क्यांनी कमी करतो. आज ३ हजार ६५० दिवस झाले हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. आत्ता पेट्रोलचा दर १०६ रुपये लिटर झाला. असा आरोप शरद पवार यांनी केला.

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
EVM
“निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं!
What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?
uday samant kiran samant narayan rane
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपाच्या नारायण राणेंना उमेदवारी; उदय सामंत म्हणाले, “आम्ही राजकारणातून…”

मोदींनी सांगितलं होतं रोजगार देणार पण काय परिस्थिती आहे बघा

“२०१४ मध्ये मोदींनी सांगितलं होतं गॅसचा दर ४१० रुपये आहे तो मी कमी करणार. आज गॅस सिलिंडरचे दर ११६० रुपये आहेत. म्हणजे जे बोलले, आश्वासन दिलं तशी कृती केली नाही. २०१४ मध्ये मोदींनी सांगितलं होतं वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देणार. आज ८६ टक्के तरुण मुलं बेकार आहेत अशी स्थिती आहे. मोदींनी आश्वासन दिलेल्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील ज्या पूर्ण झाल्या नाहीत असंही आपल्या भाषणात शरद पवार यांनी म्हटलं आहे. आश्वासन द्यायचं, शब्द द्यायचा आणि कृती त्याच्या विरोधात करायची ही मोदींची नीती असेल तर आपण आता त्यांच्या हाती सत्ता देता कामा नये. सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे.” असं शरद पवार म्हणाले.

हे पण वाचा- Video: “गावागावात विचारत आहेत म्हातारी, शरद पवार…”, रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; फडणवीसांनी लावला डोक्याला हात!

लोकशाही उद्धवस्त करण्याचं काम मोदींनी केलं

“झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे, तिथे आदिवासी मुख्यमंत्री आहेत. मोदींवर टीका केली म्हणून सोरेन यांना तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदींनी तुरुंगात टाकलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोदींना विरोध केला त्यांच्या सरकारमधले तीन मंत्री तुरुंगात आहेत. सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, मात्र लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. अशावेळी तुमची आणि माझी जबाबदारी आहे की मोदी आणि त्यांच्या विचारांच्या पक्षाचा आपल्याला पराभव करायचा आहे” असं शरद पवार म्हणाले.