भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले. पंजाबने काँग्रेसचा ‘झाडू’न धुव्वा उडवला. ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली. पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केले. या निकालावर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात भाजपा सरकार पाडणार?; फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले “पर्यायी सरकार…”

“भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचंच राज्य होतं, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष ४२ वरुन १२५ वर पोहोचला असून जागा तिप्पट वाढल्या आहेत. भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचं योगदान आहे हे मान्य करावं लागेल. त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पाचही राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर शशी थरुर पक्षाला स्पष्टच बोलले; “जर यश हवं असेल…”

“लोकशाहीत विजय-पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपाचा विजय झाल्याचं आम्हाला दु:ख होण्याचं कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“उत्तराखंडचे मुख्यमंत्री हारले, गोव्यात दोन उपमुख्यमंत्री हारले. पण पंजाब सर्वात चिंतेचा विषय आहे. पंजाबसारख्या सीमावर्ती भागात तेथील लोकांनी राष्ट्रीय आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष भाजपाला पूर्णपणे नाकारलं. प्रधानमंत्री, गृहमंत्री, रक्षामंत्री सर्वांनी झोकून प्रचार केला तरी ते का हारले? उत्तर प्रदेश तर तुमचंचं होतं, उत्तराखंडही तुमचंच होतं, गोवाही तुमचं होतं. उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळाल्या म्हणून आम्हाला बोलत आहात ना. तिथे काँग्रेस आणि शिवसेनेचा जो पराभव झाला आहे त्यापेक्षा मोठा पराभव तुमचा पंजाबमध्ये झाला आहे. त्याबद्दल देशाला मार्गदर्शन करा,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

पंतप्रधान मोदींचा नवाब मलिकांच्या निमित्ताने शरद पवारांवर निशाणा?; म्हणाले “ही या लोकांची प्रवृत्ती…”

“या पाच राज्यांच्या निवडणुकीचा आणि मुंबई पालिकेचा काही संबंध नाही. गेली ५० वर्ष आम्ही पालिका लढत असून पालिकेवर भगवाच झेंडा कायम राहील,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

भाजपा नेत्यांकडून ‘युपी झांकी है, महाराष्ट्र बाकी है’ घोषणा दिल्या जात असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “पश्चिम बंगालच्या आधीही अशा घोषणा देत होते. पवारांनी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे ना. काय करणार आमच्यावर धाडी टाकणार, खोटे गुन्हे दाखल करणार अजून काय करु शकता. जे हवं ते करा आम्हीही तयार आहोत”.

मोदींनी तपास यंत्रणांवर दबाब टाकला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. एकाच पक्षाचे, आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत, यावर बोललं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावाखालीच काम करत असल्याच्या मताशी महाविकास आघाडी ठाम आहे. कोणी काही बोललं तर आमच्या मतामध्ये फरक पडणार नहाी. हे मी बोलल्यानंतर १० मिनिटात माझ्या घरावर धाड पडली तरी मी घाबरत नाही. राजकीय कारणासाठीच आमच्यावर हल्ले करत आहात हे थांबवा असं आम्ही सांगतो तेवहा तो दबाव कसा असू शकतो? सत्य सांगणं दबाव आहे का? सत्य ऐकण्याची तयारी ठेवा”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on assembly election result bjp sgy
First published on: 11-03-2022 at 10:38 IST