बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडतं आहे. या मतदारसंघातल्या भोर या ठिकाणी पैसे वाटप झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तसंच यासाठी त्यांनी सुनील शेळकेंना लक्ष्य केलं आहे. मात्र सुनील शेळकेंनीही आता रोहित पवारांना उत्तर दिलं आहे.

रोहित पवारांचा आरोप काय?

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांमध्ये पैशांचं वाटप झाल्याचा आरोप होत आहे. शरद पवार गटातील आमदार आणि नेत्यांनी हा आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने मतदारांना पैसे वाटले आहेत असं म्हणत शरद पवार गटाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील अजित पवार गटावर टीका केली आहे. पाठोपाठ रोहित पवार यांनी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैसेवाटप होत असल्याचा दावा करत रोहित पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर चार व्हिडीओ शेअर केले आहेत.

man killed son by stuffing bunch of notebook pages in his mouth
शहापूर : तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून पित्याकडून मुलाची हत्या
sassoon peon accepted bribe in the premises of juvenile justice board
ससूनमधील शिपायाने बाल न्याय मंडळाच्या आवारात लाच स्वीकारली, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या ताब्यात
sanjay raut mla ravi rana claim
“आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका या…”, रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर!
Nagpur RTE Admission Scam, RTE Admission Scam, Key Conspirator RTE Admission Scam, Fake Documents, right to education,
आरटीई घोटाळा : शाहिद शरीफच्या साथीदाराच्या कार्यालयाची झडती, स्कॅनरसह बनावट कागदपत्र…
AAP MP Swati Maliwal and YouTuber Dhruv Rathee
ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”
Pimpri, construction, flood line,
पिंपरी : पूररेषेच्या हद्दीत बांधकामांसाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेतले? महापालिका आयुक्त म्हणाले…
Yavatmal, farmers, officials
यवतमाळ : संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले, काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर
uddhav thackeray
भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचे दोन कार्येकर्ते पोलिसांच्या ताब्यात

हे पण वाचा- “८४ वर्षांच्या योद्ध्याला तुम्ही लढायला लावताय”, अजित पवारांची शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका; म्हणाले “त्यांना बोलताना…”

तसंच भोरमध्ये सुनील शेळकेंनी पैसे दिले आहेत असा आरोपही रोहित पवारांनी केला. बारामती मतदारसंघ आज सकाळपासून चर्चेत आहे. सुप्रिया सुळेंनी मतदान झाल्यानंतर अजित पवारांच्या घरी जाऊन आशाताई पवार (अजित पवारांच्या मातोश्री) यांची भेट घेतली आहे. तसंच रोहित पवार हे दिवसभर विविध आरोप करत आहेत. यानंतर आता माध्यमांशी बोलत असताना सुनील शेळकेंनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले आहेत सुनील शेळके?

“बारामतीच्या युवराजांना मला इतकंच सांगायचं आहे की निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली पाहिजे. त्यांनी नोकरी आणि व्यवसायातील बांधवांनाही प्रचारात उतरवलं. भोर, वेल्हा या ठिकाणी गाडीमध्ये पैसे टाकून अर्धवट व्हिडीओ तयार केले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपला पराभव त्यांना दिसू लागला आहे. भोरच्या स्थानिक गुंडांना हाताशी धरलं आणि आमच्या भोरचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना घरात घुसून मारहाण केली. याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाने संपूर्ण सत्यता तपासावी, सत्य सगळ्यांसमोरर आणावं” असं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.

निकाल तुमच्या समोर येणारच आहे

“येत्या काही दिवसांत निकाल तुमच्यासमोर येणार आहे. त्यानंतर सत्य काय आहे ते तुमच्या समोर येणार आहे. रोहित पवारांना मला हे सांगायचं आहे की नौटंकी करुन राजकारण करु नका. स्वतःचं कर्तृत्व मोठं करुन मोठं व्हा. अजित पवारांना व्हिलन करुन रोहित पवार मोठे होणार नाहीत.” असंही सुनील शेळके म्हणाले.

खंडोबाच्या पायथ्याशी मटणाच्या गाड्या रिकाम्या करणाऱ्यांनी..

तुम्ही आम्हाला राजकारण आणि स्वाभिमान शिकवू नका. रोहित पवार रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी म्हणत होते. पण संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या खंडोबाच्या पायथ्याशी मटणाच्या दोन दोन हजार टनाच्या गाड्या तुम्ही (रोहित पवार) रिकाम्या केल्या. तिथे मटण आणि दारु वाटली. हजार रुपये मताला वाटले. तुम्ही तुमची नौटंकी बंद करा. जाणीवपूर्वक टार्गेट करत असाल तर करा. शरद पवारांच्या नावाचा वापर करुन तुम्ही मोठे नेते होणार नाहीत असंही सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.