सर्वच राजकीय पक्षांकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव त्यांचा मुलगा आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रचारासाठी करहलला पोहोचले होते. यावेळी त्यांना अखिलेश यादव येथून निवडणूक लढवत असल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे या जागेवरून जो कोणी निवडणूक लढवतो. त्याला मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं.

अखिलेश यादव करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जिथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी मुलायम सिंह यादव पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाषण केले. त्यांच्या उपस्थितीत सपा समर्थक चांगलेच जल्लोषात होते आणि भाषण करताना इथल्या उमेदवाराला मत द्या, असं म्हणाले.

मुलायम सिंह बोलत असताना त्यांच्या शेजारी उभे असलेले सपा नेते धर्मेंद्र यादव म्हणतात, आता लोकांकडे मतं मागा. हे ऐकून मुलायम हसतात आणि म्हणतात की इथून जो कोणी उमेदवार असेल, त्याला मत द्या. यावर धर्मेंद्र यादव पुन्हा त्यांना थांबवतात आणि सांगतात की अखिलेश यादव येथून उमेदवार आहेत. त्यानंतर ते थरथरत्या आवाजात म्हणतात की, ‘अखिलेश येथून उमेदवार असतील तर त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा.’

अखिलेश यादव यांना मतदान करून समाजवादी पक्ष मजबूत करण्याचे आवाहन मुलायम यांनी जनतेला केले. आम्ही सर्वजण तुमच्या भावनेचा आदर करतो. यासोबतच राज्यात सपाचे सरकार आल्यास तरुणांसाठी रोजगाराची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन मुलायम सिंह यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करहल जागेवर भाजपाने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना अखिलेश यादव यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. या रॅलीत अमित शाह यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधत त्यांना हरवणार असल्याचे सांगितले. करहलमध्ये २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निकाल १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.