Karnataka CM Latest News : गेल्या ४८ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर कर्नाटकला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाळ यांनी मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची निवड केल्याची माहिती दिली. या दोहोंमध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत लागली होती. अखेर पक्षाध्यक्षांचा आदेश मानत दोघांनीही आप-आपल्याला मिळालेल्या पदांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“सर्वकाही ठीक आहे आणि यापुढेही सर्व चांगलं होईल. आपल्या सर्वांना एकत्र काम करायचं आहे आणि ते आपण स्वीकारलं आहे, असं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे”, असं डी. के. शिवकुमार म्हणाले. त्यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, २० तारखेला शपथविधी होणार आहे. त्याआधी शिवकुमार पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?

कर्नाटकच्या सत्तेची माळ काँग्रेसच्या गळ्यात पडल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोहोंमध्ये पदासाठी चूरस निर्माण झाली होती. १३ मे रोजी निकाल लागल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण या एकाच प्रश्नाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. तर, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या होत्या. दोघेही मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरुन बसले होते. त्यामुळे या पदाचा तिढा सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तीन सदस्यीय निरीक्षण समितीही स्थापन करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणात खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केला. विविध बैठका घेऊन मुख्यमंत्री पदाचा पेच संपुष्टात आणला.

हेही वाचा >> Video : ठरलं ! कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब, शिवकुमारांनाही उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी

काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी डी. के. शिवकुमार यांची समजूत काढली असल्याचं राजकीय वर्तुळातून समोर येतंय. त्यामुळे डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. परिणामी सिद्धरामय्या पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार असून उपमुख्यमंत्रीपदाची माळ डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात पडली आहे. या पदांबाबत के. सी. वेणुगोपाल यांनी अधिकृत माहिती दिल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी ट्वीटही केलं होतं.

“कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि लोकांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही याची हमी देण्यासाठी एकजूट आहोत”, असं ट्वीट डी. के. शिवकुमार यांनी केलं.