12 July 2020

News Flash

समजून घ्या सहजपणे…AC मुळे करोना कसा पसरतो

करोना व्हायरस वणव्यासारखा पसरतोय. म्हणूनच, संयम पाळणे आणि या विषाणूचा प्रसार कसा होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.

– डॉ. अजित कुलकर्णी

जगभर करोना व्हायरसने (कोविड-19) हाहाकार माजवला आहे आणि या आजाराने आजवर असंख्य बळी घेतले आहेत. हा आजार वणव्यासारखा पसरतो आहे. म्हणूनच, संयम पाळणे आणि या विषाणूचा प्रसार कसा होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. दोन व्यक्ती एकमेकाच्या निकट संपर्कात आल्यास एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा ड्रॉप्लेट इन्फेक्शनद्वारे हा आजार संक्रमित होतो. आजारी व्यक्तीचा कफ, शिंक यातून उडालेल्या थेंबांतून हवेमध्ये विषाणू सोडले जाऊ शकतात. हे विषाणू वस्तूच्या पृष्ठभागावर अनेक तास ते दिवस जिवंत राहू शकतात.

एचव्हीएसी संघटनांच्या युरोपीय युनियनने सल्ला दिला आहे की, ह्युमिडिफिकेशन, एअर कंडिशनिंग व डक्ट क्लीनिंग यांचा कोरोना विषाणूंच्या संक्रमणावर प्रत्यक्षात काहीही परिणाम होत नाही. (आरईएचव्हीए म्हणजे फेडरेशन ऑफ युरोपीयन हीटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग असोसिएशन्स) याच दस्तावेजाच्या अनुसार, ह्युमिडिफिकेशन, एअर कंडिशनिंग यांचा कोरोना विषाणूंच्या संक्रमणावर प्रत्यक्षात काहीही परिणाम होत नाही. SARS-CoV-2 अशा अन्य विषाणूंपेक्षा कोविड-19 आजारांना कारणीभूत ठरणारा विषाणू वेगळा असून तो पर्यावरणातील बदलांचा प्रतिरोध करू शकतो, तसेच या विषाणूवर केवळ 80% वरील आर्द्रता व 30˚C पेक्षा अधिक तापमान यांचा परिणाम होतो.

या दस्तावेजाच्या मते, कोविड-19 चा प्रसार होण्यावर थेट परिणाम होत नसल्याने, हीटिंग व कूलिंग सिस्टीम्स नेहमीप्रमाणे वापरता येऊ शकतात. एनसीआयडी संशोधकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये आढळले आहे की, कोविड-19 साठी कारणीभूत असणारा विषाणू एखाद्या रुग्णाच्या खोलीशी जोडलेल्या एअर डक्टसह आयसोलेशन फॅसिलिटींमध्ये आढळू शकतो, यातून हा आजार हवेतून पसरणारा असल्याचे सिद्ध होत नाही. हा विषाणू पसरण्याचे एक मुख्य कारण म्हणजे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट, असे प्राथमिक अभ्यासामध्ये दिसून आले आहे.

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एनसीआयडी पाहणीनुसार, आयसोलेशन रूम स्वच्छ करण्याच्या आधी, सौम्य स्वरूपाची लक्षणे असणारा कोविड-19 रुग्ण आयसोलेशन रूममध्ये “लक्षणीय पर्यावरणीय दूषितीकरण ” होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. एका रुग्णाने वापरलेल्या शौचालयाच्या भांड्यातून व सिंकमधून गोळा केलेल्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये विषाणू अस्तित्वात असल्याचे आढळले. स्वच्छता केल्यानंतर पुन्हा केलेली चाचणी मात्र नकारात्मक आली. हा विषाणू नाहीसा करण्यासाठी दूषीतिकरणविरोधी उपाय पुरेसे असल्याचे यातून स्पष्ट होते.

“विषाणूचा समावेश असणारे लहान थेंब हवेमुळे अन्यत्र हलवले जाऊ शकतात व व्हेंटसारख्या उपकरणांवर सोडले जाऊ शकतात”, यामुळे विषाणूंच्या संक्रमणाबद्दल पुन्हा एक आंतरराष्ट्रीय चर्चा सुरू होऊ शकते, असेही पाहणीमध्ये नमूद करण्यात आले आहे. विषाणूचा प्रसार कसा होतो, यापेक्षाही पर्यावरणाचे दूषीतिकरण अभ्यासणे, हा या पाहणीचा मुख्य हेतू होता, असे संशोधकांनी सांगितले.  “या आजाराचा विषाणू हवेतून पसरतो की नाही, हे सिद्ध करणे, हा यामागील हेतू नसून; हा विषाणू आयसोलेशन फॅसिलिटींभोवती विखुरलेला असल्याचे तुम्हाला सांगणे, इतकाच उद्देश आहे.”

( टीप – आमच्याकडे सध्या असणारे सर्व पुरावे व संशोधन हे आजाराचा फैलाव होण्यासाठी एअर कंडिशनिंग कारणीभूत आहे, असे स्पष्टपणे अधोरेखित किंवा सिद्ध करत नाहीत. )

(लेखक पल्मोनॉलॉजिस्ट व क्रिटिकल केअर एक्स्पर्ट, अॅस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:01 pm

Web Title: explained how ac should increase coronavirus nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे…Coronavirus चा उपचार आरोग्य विम्यातून होतो का?
2 Coronavirus : समजून घ्या… सहजपणे – किती भयानक वेगानं पसरतोय करोना?
3 Coronavirus: समजून घ्या सहजपणे… ‘विलगीकरण’ म्हणजे काय?
Just Now!
X