करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला करोनापासून सुरक्षा मिळाली असं तुमचा समज असेल तर तो वेळीच दूर करा. कारण लसीकरणानंतर लगेच करोनापासून सुरक्षा मिळाते हा समज चुकीचा असल्याचं तज्ज्ञ सांगतात. इंग्लंडमधील एका नव्या संशोधनामध्ये यासंदर्भातील खुलासा करण्यात आलाय. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी लस घेतलेल्या व्यक्तीला करोना संसर्गाचा धोका नसतो यासंदर्भात हे संशोधन करण्यात आलं. तसेच दुसरा डोस घेतल्यानंतर नक्की काय होतं याचाही अभ्यास करण्यात आलाय. चला तर मग जाणून घेऊयात या संशोधनामध्ये काय माहिती समोर आलीय…

नक्की वाचा >> समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ

संशोधनात काय दिसून आलं?

इंग्लंडमधील यूके ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स म्हणजेच ओएनएसने जारी केलेल्या आकडेवारीनुसार करोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २१ दिवसांनंतर लस घेतलेली व्यक्ती या विषाणूपासून सुरक्षित होते. म्हणजेच लस घेतल्यानंतर तीन आठवड्यांना शरीर अशा स्थितीमध्ये पोहचतं की ज्यामुळे व्यक्तीला करोनाचा संसर्ग होऊ शकत नाही. तसेच लस घेतल्यानंतर २१ दिवस उलटून गेल्यावरही संसर्ग झालाच (याची शक्यता फारच कमी असते) तर त्याचे फारसे दुष्परिणाम होत नाही. रुग्णाची प्रकृती खालावण्याची किंवा त्याला रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता अगदीच कमी असते.

नक्की वाचा >> समजून घ्या : देशामधील करोना संसर्गाचा वेग एवढ्या झपाट्याने का कमी होतोय?

…तर पुन्हा संसर्गाचा धोका

करोनाची लस घेतल्यानंतर २१ दिवसांनंतर म्हणजेच तीन आठवड्यांनंतर शरीरामध्ये करोना संसर्गापासून बचाव करण्यासंदर्भातील अपेक्षित बदल घडतात. मात्र या २१ दिवसांदरम्यान लस घेतलेल्या व्यक्तीने करोना प्रोटोकॉल पाळले नाहीत आणि बेजबाबदारपणे वागल्यास त्याला करोना संसर्गाचा धोका असतो.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल

…म्हणून लसीकरण उत्तम मार्ग

ओएनएसचा हा अहवाल ३१ मे २०२१ च्या आकड्यांवर आधारित आहे. यामध्ये करोनाची पहिली लस घेतल्यानंतर १६ दिवस करोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो असं सांगण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर पुढील आठवड्याभरात करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वेगाने कमी होते. लस घेतल्यानंतर एका महिन्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते. लसीकरणानंतर करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्यानेच लसीकरण हे करोनाविरुद्धचे सर्वोत्तम हत्यार असल्याचं मानलं जातं.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

पहिला डोस घेतलेल्या किती जणांना झाला संसर्ग?

इंग्लंडमधील दोन लाख ९७ हजार ४९३ जणांचे नमुने लसीकरणानंतर घेण्यात आले. त्यापैकी केवळ ०.५ टक्के लोकांना करोनाचा नव्याने संसर्ग झाल्याचं दिसून आलं. ज्या लोकांनी फायझर-बायोएनटेकची लस घेतली होती त्यांच्यापैकी ०.८ टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला. तर ज्यांनी ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची लस घेतली त्यांच्यापैकी ०.३ टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला. ही आकडेवारी पहिल्या डोसनंतरची आहे.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

दुसरा डोस घेणाऱ्यांबद्दलची आकडेवारी काय?

ज्या दोन लाख १० हजार ९१८ जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते, त्यांच्यापैकी ०,१ टक्के लोकांना लसीकरणानंतर करोनाचा संसर्ग झाला. काहींना करोनाची लस घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच करोनाची लागण झाली होती. मात्र यापैकी अनेकांना करोनाचा संसर्ग लस घेण्याच्या आधीच झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. या लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती किंवा लसीकरण केंद्रावर हे लोक एखाद्या करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. हा अभ्यास इंग्लंडमध्ये कऱण्यात आला असला तरी थोड्या फार प्रमाणात फरक सोडल्यास ही गोष्ट सर्वच लसींसाठी लागू होते, कारण लसींच्या दोन डोसमधील अंतर आणि त्याचे परिणाम या गोष्टी कमी अधिक प्रमाणात सारख्याच आहेत.

नक्की वाचा >> Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?

वयोमानानुसार वेगळे परिणाम…

या संशोधनामध्ये वयोमानानुसार वेगवेगळे परिणाम दिसून आले आहेत. यापैकी एका संशोधनामदरम्यान करोनाची एकही लस न घेणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आलाय. २० मे ते ७ जूनदरम्यान इंग्लंडमध्ये एक लाख १० हजार स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये करोनाचा संसर्ग दर ११ दिवसांनी दुप्पट झाल्याचं पहायला मिळालं. म्हणजेच ६७० पैकी दर एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला. वायव्य इंग्लंडमध्ये हे प्रमाण अधिक होतं.

नक्की वाचा >> ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?

तरुणांमध्ये संसर्गाचा वेग अधिक…

लंडनमधील इंपीरियल कॉलेजचे संशोधक आणि या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या स्टीवन रिले यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी तरुणांमध्ये करोना संसर्गाचा वेग अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. युनायटेड किंग्डममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संसर्गाचे प्रमाणही वेगवेगळे आहे. त्यामुळेच देशभरातील संसर्गाचे प्रमाण काढणे कठीण असल्याचं रिले सांगतात.

नक्की वाचा >> समजून घ्या : ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते?

नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?

खोलात जाऊन अभ्यास केल्यास…

इंपीरियल कॉलेजचेच दुसरे संशोधक पॉल एलियन यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त खोलात जाऊन अभ्यास केला तर थक्क करणारी माहिती समोर येते. उदाहरणार्थ ज्या वयस्कर लोकांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांना संसर्गाचा धोका फार कमी असतो. ते लोक अधिक सुरक्षित असतात. मात्र ६५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांमध्ये हे दिसून येत नाही. त्यांनी एक डोस घेतलेला असो किंवा दोन त्यांच्यामध्ये करोना संसर्गाचं प्रमाण अधिक आढळतं. अर्थात एकूण लसीकरणाच्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे.